NDTV चॅनेलमधून रवीश कुमारांचा राजीनामा? ट्वीट करत म्हणाले, “मोदींनी…”

WhatsApp Group

Ravish Kumar resignation : अदानी (Adani) समूहानं मीडिया समूह एनडीटीव्ही (NDTV) मधील २९ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. तेव्हापासून चर्चेचा बाजार तापला आहे. अदानी समूहाची एनडीटीव्ही कंपनीवर पकड मजबूत झाल्यामुळं प्रसिद्ध अँकर रवीश कुमार हेही टीव्ही चॅनलचा राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, खुद्द रवीश कुमार यांनी अशा अटकळांना उत्तर दिलं. भारतातील लोकप्रिय टीव्ही अँकर, लेखक आणि पत्रकार म्हणून रवीश कुमार यांची ओळख आहे. रवीश कुमार हा टीव्ही बातम्यांच्या दुनियेतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. एनडीटीव्हीवर येणारा त्यांचा प्राइम टाइम हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच आवडतो. सध्याच्या सरकारशी थेट स्पर्धा घेणाऱ्या पत्रकारांमध्ये रवीश कुमार यांची गणना होते. सरकारला तिखट प्रश्न विचारण्यासाठी त्यांची ओळख आहे. यामुळेच देशातील एक मोठा वर्ग रवीश कुमारला खूप आवडतो.

काय म्हणाले रवीश कुमार?

आता रवीश कुमार यांनीच आपल्या अफवेला तोंड दिलं आहे. त्यांनी त्यांच्याच शैलीत एक ट्विट करून अशा प्रकारच्या अटकळांचे खंडन केलं आहे. ”माननीय लोकांनो, माझा राजीनामा ही केवळ अफवा आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मुलाखत देण्याचं मान्य केलं आहे आणि अक्षय कुमार गेटवर मुंबईचे आंबे घेऊन माझी वाट पाहत आहे.”

हेही वाचा – मुंबईत ना दिल्लीत, एलोन मस्कचा ‘हा’ मराठमोळा मित्र राहतो पुण्याच्या गल्लीत!

रवीश कुमार यांनी स्वत:ला जगातील पहिला आणि सर्वात महागडा झिरो टीआरपी अँकर म्हणून ओळखले आहे. रवीश कुमार यांचं ट्विट मोठ्या संख्येनं लोकांनी रिट्वीट केलं आहे. एनडीटीव्हीची हिस्सेदारी अदानी समूहाच्या हातात गेल्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा फेरा जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येनं लोक मीम्सही शेअर करत आहेत. सोशल मीडियावरही लोकांची मतं विभागली गेली आहेत. रवीश कुमार यांना चांगला पत्रकार म्हणून संबोधत मोठ्या संख्येनं लोकांनी त्यांचं समर्थन केलं आहे. त्याचबरोबर एक वर्ग असाही आहे, ज्यांनी सोशल मीडियावर रवीश कुमार आता काय करणार असा सवाल केला आहे.

हेही वाचा – भारताचे गौतम अदानी ठरले जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती; बिल गेट्स यांना टाकलं मागे!

एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये वाढ

रवीश कुमार यांची ही प्रतिक्रिया त्यांच्या भविष्याबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान आली आहे. सध्यातरी रवीश कुमार एनडीटीव्हीमध्येच राहणार हे स्पष्ट आहे. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी आली आहे. मंगळवारी एनडीटीव्हीचा शेअर ३६६ रुपयांवर बंद झाला, मात्र बुधवारी सकाळीच त्यात पुन्हा वाढ झाली आहे. सध्या तो ३८८ रुपयांवर व्यवहार करत आहे. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये यंदा ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment