हवामान अंदाज बघण्यासाठी नासा खरंच ‘दाते पंचांग’ वापरते?

WhatsApp Group

NASA-Date Panchang Fact : सध्या हवामान विभागाचे अंदाज किती चुकतात, हे सर्वांना ठाऊक आहे. पण त्यांचे अंदाज अगदीच बाजुला ठेऊन चालत नाहीत. लोकांच्या जीवाच्या दृष्टीने सरकारला आधीच तयार राहण्यासाठी असे अंदाज माहीत असावे लागतात. पण बदलत्या काळानुसार, हे अंदाज अचूक ठरण्याच्या बाबतीत अनेक लोक पंचागाचा आधार घेतात. त्यामुळे सोशल मीडियावर हवामान विभाग विरुद्ध पंचांग अशी लढाई पाहायला मिळते. आता अजुन एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुण्यात झालेल्या अतिवृष्टीचा अंदाज पंचांगाचा कसा खरा ठरला, याबाबत हा मेसेज आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये 21 जुलै ते 25 जुलै जास्त पावसाची स्थिती सांगण्यात आली. शिवाय एक मेसेजही देण्यात आलाय, ज्यात अंतराळ संस्था नासा दाते पंचाग वापरते, असा दावा करण्यात आला आहे. यात एका व्यक्तीने म्हटलंय, ”मी जिथे लाल रंगाचा चौकोन बनवला आहे, तिथली संपूर्ण माहिती वाच. स्पष्टपणे लिहिले आहे. या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल. पूर व अतिवृष्टीची शक्यता आहे. 21 जुलै ते 25 जुलै पावसाची जास्त शक्यता आहे. गेले चार दिवस किती पाऊस पडतोय त्याचा अंदाज आलाच असेल. लोकांचा ज्योतिषावर विश्वास नसतो पण प्रत्यक्ष बघ. अनुभव घेतल्याशिवाय कधी कळत नाही. दाते पंचांग वाल्याने हवामान खात्याच्या लोकांना चॅलेंज दिला होता की गेल्या दहा वर्षातील तुमचा हवामान अंदाज बघा आणि आम्ही पंचांगात छापले ते बघा. आमचे अंदाज कधीच चुकत नाहीत. पुढच्या वर्षीच्या पावसाचा अभ्यास अगोदरच वर्षभर करावा लागतो, कारण पंचांग हे नवीन वर्ष सुरू व्हायच्या अगोदर म्हणजेच चैत्र महिन्याच्या अगोदर चार-पाच महिने छापून बाजारात आलेले असते. हवामान खाते सध्याची परिस्थिती अभ्यास करून सांगतात पण पंचांग वाले एक वर्ष अगोदरच अभ्यास करून पंचांग छापतात. NASA ( National Aeronautics And Space Administration. ) सुद्धा आपले दाते पंचांग वापरते. हे फार कमी जणांना माहिती आहे. तसेच इतर धर्मातील लोकही दाते पंचांग वापरतात, हेही मला चांगले माहिती आहे. शेवटी भारतीय ज्ञान हेच सर्वश्रेष्ठच आहे.”

यापूर्वी नासाला भारतीय पंचांगातून सूर्यग्रहणाविषयी अचूक माहिती मिळते का? अशा प्रश्नाचे निरसन newschecker ने केले होते. त्यात newscheckerला नासाच्या खगोलशास्त्र विभाग वेबसाइटवर सूर्यग्रहणासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) उत्तरे मिळाली, ज्यामध्ये एजन्सीने सूर्यग्रहण आणि त्याच्या अभ्यासासंबंधी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तरे दिली आहेत. नासा आणि त्याच्या संबंधित विभागांच्या वेबसाइट्स देखील शोधल्या, परंतु त्यांना व्हायरल दाव्याचे समर्थन करणारी कोणतीही माहिती आढळली नाही.

हेही वाचा – गुगलला टक्कर देण्यासाठी येतंय SearchGPT, काहीही शोधू शकाल! एकदा पाहाच हा Video

newschecker च्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, सूर्यग्रहणाची अचूक माहिती भारतीय दिनदर्शिकेतून प्राप्त झाली आहे हे मान्य करण्याच्या नावाखाली नासाकडून शेअर करण्यात येत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक त्यांनी असे कोणतेही विधान दिलेले नाही. हे शक्य आहे की सोशल मीडियााच्या लोकांनी हे सत्य म्हणून स्वीकारले असावे.

त्यांच्या एका वेबसाइटवर, NASA ने नमूद केले आहे की ते कॉम्प्लेक्स कॉम्प्युटर कॅल्क्युलेशनचा वापर करून ग्रहणाचे अंदाज वर्तवतात. पण नासा हवामान अंदाजासाठी दांते पंचांग वापरते, असे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment