डॉक्टरांसह तुम्हीही हादराल..! तरुणाच्या पोटात सापडली ‘इतकी’ नाणी; नक्की वाचा!

WhatsApp Group

मुंबई : राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात शुक्रवारी डॉक्टरांसमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून ६३ नाणी काढली आहेत. तरुणाचा एक्स-रे करत असताना डॉक्टरांना तरुणाच्या पोटात नाण्यांचा ढीग दिसला, त्यानंतर उपस्थित सर्वांनी कपाळाला हात लावला. सुमारे दीड तास तरुणाचे ऑपरेशन सुरू होते, त्यानंतर सर्व नाणी बाहेर काढण्यात आली आहेत.

जोधपूरच्या चौपास्नी हाऊसिंग बोर्डमध्ये राहणारा ३६ वर्षीय तरुण पोटदुखीची तक्रार घेऊन गुरुवारी दुपारी चार वाजता मथुरादास माथूर हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पोटात तीव्र वेदना होत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी डॉक्टरांच्या पथकानं तरुणाचा एक्स-रे केला, त्यानंतर पोटात नाणी सापडली.

हेही वाचा – CWG 2022 INDW Vs PAKW : मॅचनंतर हरमनप्रीत कौरनं जिंकली मनं; पाकिस्तानी खेळाडूला दिलं गिफ्ट! पाहा PHOTO

त्याचवेळी, ऑपरेशननंतर, रुग्णानं सांगितलं, की त्यानं नाणी गिळली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या टीमनं जवळपास दीड तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पोटातून नाण्यांचा ढीग बाहेर काढला. सध्या या तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नाणी कधी गिळली?

तरुणाच्या पोटात नाणी सापडल्यानंतर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागानं एन्डोस्कोपी करून ही शस्त्रक्रिया केली, त्यानंतर ट्रेमध्ये नाण्यांचा ढीग साचला. तरुणाला नाणी कधी गिळली हे कळलंच नाही, असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडं एमडीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.विकास राजपुरोहित यांनी ऑपरेशननंतर माहिती दिली की, हे ऑपरेशन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाकडून एंडोस्कोपीद्वारे यशस्वी झाले. तरुणाची तपासणी करण्यात आली असून सर्व नाणी बाहेर काढण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या टीमनं सांगितलं की बहुतेक नाणी एक रुपयाची आहेत.

अशी अनोखी प्रकरणं रुग्णालयातील डॉक्टरांसमोर येत असतात. काही वर्षांपूर्वी जोधपूरमध्येच एकाच वेळी पोटातून मोठ्या प्रमाणात नाणी काढल्याची घटना समोर आली होती. त्याच वेळी, तीन वर्षांपूर्वी, उदयपूरमध्ये २४ वर्षीय तरुणाच्या पोटातील शस्त्रक्रियेदरम्यान ५० प्रकारच्या गोष्टी काढून टाकण्यात आल्याची घटनाही समोर आली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment