लक्ष द्या..! कार-बाईकमध्ये इंधन टाकी पूर्ण भरू नका; सरकारने दिली ‘अशी’ सूचना!

WhatsApp Group

Fuel Tank : ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नुकतेच वाहनांमध्ये इंधन भरण्याच्या खबरदारीबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे. मंत्रालयाने वाहनचालकांना इंधन टाकी कधीही पूर्ण भरू नये असे आवाहन केले आहे. यासोबतच वाहन निर्मात्यांनी इंधन टाकीच्या योग्य क्षमतेपेक्षा कमी दाखवल्याचा आरोपही मंत्रालयाने केला आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वाहनाच्या मॅन्युअल बुकमध्ये दिलेली मर्यादा इंधन टाकीच्या वास्तविक क्षमतेपेक्षा 15-20 टक्के कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहन विहित मर्यादेपेक्षा अधिक इंधन कसे वापरत असल्याने इंधन टाकी भरणाऱ्या नागरिकांची फसवणूक होते. अशा परिस्थितीत लोक पेट्रोल पंपावर चुकीचा आरोप करू लागतात.

मंत्रालयाने वाहनांच्या इंधन भरण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत, ज्यामध्ये इंधन भरताना काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. वाहनांमधील इंधन टाकी भरणे धोकादायक ठरू शकते, असे सांगण्यात आले आहे. टाकी भरल्याने इंधनाची गळती होऊ शकते आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर..! तुमच्या शहरात किती झालंय? जाणून घ्या!

पेट्रोलमधून बाहेर पडणाऱ्या वाफेला जागा मिळू शकते, त्यामुळे टाकी भरू नये, असे निर्देशात पुढे म्हटले आहे. जेव्हा टाकी भरलेली असते, तेव्हा जास्त दाब निर्माण होतो, ज्यामुळे इंजिनमध्ये जास्त इंधन वापरले जाते आणि याचा परिणाम वाहनाच्या इंजिन कार्यक्षमतेवर होतो. यामुळे इंधन योग्यरित्या जळत नाही आणि अधिक हायड्रोकार्बन देखील उत्सर्जित होते.

जर टाकी भरली असेल तर वाहन झुकल्यावर इंधन बाहेर पडू शकते, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. पेट्रोल हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे आणि टाकीतून इंधन गळती झाल्यास आग लागू शकते. मंत्रालयाने वाहन कंपन्यांना ग्राहकांना इंधन टाकी न भरण्याची सक्तीची सूचना करण्याचे आवाहनही केले आहे.

अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात वाहनात जास्त इंधन टाकण्यावरून लोक पेट्रोल पंप कर्मचार्‍यांशी भांडताना आढळून आले आहेत. अशा सर्व प्रकरणात, ग्राहकांनी कंपनीच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त इंधन टाकी भरल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment