Diwali Bonus Gift : मालक असावा तर असा..! कर्मचाऱ्यांना दिल्या गाड्या, फ्लॅट, ज्वेलरी; वाचा!

WhatsApp Group

Diwali Bonus Gift : दिवाळीनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याकडून भेटवस्तूंची अपेक्षा असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला जातो. खासगी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांच्या मालकाच्या मूडवर अवलंबून असते. देशातील काही उद्योगपती असे आहेत जे प्रत्येक दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना एकापेक्षा जास्त भेटवस्तू देतात. मग तो मॅनिफोल्ड बोनस असो वा चमचमीत नवी कार, राहण्यासाठी फ्लॅट असो किंवा BMW सारखे लक्झरी वाहन असो. भारतातील काही कंपन्यांचे मालक अतिशय मनमिळाऊ आहेत.

चेन्नईतील जयंती ज्वेलरी स्टोअरच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक मिळाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. जयंती लाल चालानी यांनी आठ कर्मचाऱ्यांना कार आणि १८ कर्मचाऱ्यांना बाईक दिल्या. कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅश बोनस देण्याऐवजी कंपनीने यावर्षी गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा विचार असा होता की दोन महिन्यांत रोकड संपेल पण गाडी दीर्घकाळ तुमच्याकडे असेल. याबाबत कर्मचाऱ्यांना काहीही सांगण्यात आले नाही. त्याला सरप्राईज मिळताच अनेकांना अश्रू अनावर झाले. कंपनीने पाच वर्षांच्या गॅरंटीसह स्वयंचलित गाड्यांचे वितरण केले आहे. सगळ्यात भारी म्हणजे या कर्मचाऱ्यांना या गाड्यांसह इंश्युरन्स आणि टाकी फुल करून इंधन मिळाले आहे.

हेही वाचा – LIC Dhan Varsha Plan : दिवाळीत LIC कडून ‘उत्तम’ गिफ्ट..! मिळणार १० पट रिस्क कव्हर

सावजी ढोलकिया महागड्या भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध

गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया दरवर्षी दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देतात. २०१४ मध्ये ४९१ कार आणि २०७ फ्लॅट्स दिवाळी बोनस म्हणून देण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांनी दिवाळीला ४०० फ्लॅट आणि १२६० कार गिफ्ट केल्या होत्या. २०१८ मध्ये त्याने आपल्या तीन कर्मचाऱ्यांना महागडी मर्सिडीज-बेंझ कार भेट दिली.

IT कंपनीकडून कर्मचाऱ्यांना BMW

चेन्नईस्थित कंपनी किसफ्लोने यावर्षी एप्रिलमध्ये आपल्या ५ कर्मचाऱ्यांना BMW सारखी लक्झरी कार भेट दिली होती. या सर्वांना ८० लाख रुपये किंमतीची BMW 530d देण्यात आली होती. कंपनीचे सीईओ सुरेश संबदम यांनी तेव्हा सांगितले होते की, हे पाच कर्मचारी सुख-दु:खात कंपनीसोबत राहिले. फेब्रुवारीमध्ये केरळमधील एका व्यावसायिकानेही आपल्या कर्मचाऱ्याला मर्सिडीज बेंझ भेट दिली होती.

Leave a comment