पंतप्रधान मोदींची पोल खोलणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ, पाहा भारतीयांना कसं फसवलं जातंय!

WhatsApp Group

Dhruv Rathee New Video Reality of Narendra Modi : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीने एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित आहे. मोदींच्या लहानपणी चहा विकण्यापासून ते आजवरच्या गोष्टींपर्यंत ध्रुवने अतिशय पद्धतशीरपणे सांगितल्या आहेत. जनतेची कशी फसवणूक करून मोदींची प्रतिमा त्यांच्या मनात बिंबवली गेली आहे, या प्रतिमेखाली मोदींना देव कसे बनवले गेले, याबाबत ध्रुवने सांगितले.

मोदींनी स्वतः चहा विकला, पत्रकारांनी ही कथा पुढे आणण्यात कशी चूक केली, याचाही उल्लेख या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मोदींची कहाणी अतिशयोक्ती कशी होती या प्रश्नाचे उत्तर आहे. मोदींनी त्यांच्या संघर्षाची 35 वर्षे कशी सुखात घालवली, गरिबीत असतानाचे सांगून परदेश दौरे कसे केले, मोठमोठ्या लोकांच्या लग्नात लावलेली उपस्थिती आणि नातेवाईकांकडे दुर्लक्ष, कुटुंबाला दूर ठेवून देशासाठी काम केले, हे सांगतानाचा मोठेपणा, या सर्व गोष्टींची उहापोह राठीने आपल्या व्हिडिओत केली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला, सर्वोच्च न्यायालयात याचिका!

व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीद्वारे लोकांना धर्माच्या नावाखाली कसे तापवले जाते, हे सुद्धा ध्रुवने सांगितले. गाड्यांवर लावण्यात येणाऱ्या देव-देवतांचे स्टीकर्स रागीट का बनवले जातात, याचाही उलगडा त्याने केला. राहुल गांधींची खिल्ली उडवणारे व्हिडिओ लोकांमध्ये खूप व्हायरल होतात. पण ध्रुवने मोदींचीच खिल्ली उडवणारे व्हिडिओ समोर आणले. हिटलर, मुसलिनी ते अदानी यांचा उल्लेखही ध्रुवने या व्हिडिओत केला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment