Dhruv Rathee New Video | युट्युबर ध्रुव राठी, जो नेहमी आपल्या व्हिडिओंमुळे चर्चेत असतो. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये ध्रुवने भारतात हुकुमशाही येणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोबत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही ध्रुवने प्रश्न उपस्थित केला. ध्रुव राठी आपल्या व्हिडीओच्या सुरुवातीला विचारताना दिसत आहे की, आपल्या देशात लोकशाही संपली आहे का? कमी-अधिक प्रमाणात, त्याने सर्वच मुद्दे उपस्थित केले आहेत जे विरोधी नेते वेळोवेळी उपस्थित करतात.
यूट्यूबर ध्रुव राठीने त्याच्या एका व्हिडिओमध्ये ईडी आणि सीबीआयसारख्या सरकारी एजन्सींच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोपही सरकारवर करण्यात आला आहे. यासोबतच देश वन नेशन वन पार्टीकडे वाटचाल करत असल्याचेही त्याने म्हटले आहे. ध्रुव राठीच्या या व्हिडिओचे समर्थन अनेकांनी केले आहे.
व्हिडिओमध्ये, ध्रुव अतिशय शांततेने स्पष्ट करतो, की लोकशाहीच्या नावाखाली भारतात हुकूमशाही का आणि कशी रुजत आहे. तार्किक पद्धतीने आणि खळबळ न करता, भडक शब्दांशिवाय ध्रुवने या व्हिडिओत अनेक मुद्दे मांडले आहेत. मला या व्हिडिओसाठी विरोधी पक्षाने फंडिंग केलेले नाही, हेसुद्धा ध्रुवने या व्हिडिओत सांगितले.
हेही वाचा – 19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका, 22 मे रोजी निकाल?
29 वर्षांचा ध्रुव राठी हा रोहतकचा आहे. तो दिल्लीत मोठा झाला आणि दिल्ली पब्लिक स्कूल, आरके पुरम येथे शिकला. त्याने कार्लस्रुहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जर्मनीमधून यांत्रिक अभियांत्रिकी पूर्ण केली, त्यानंतर त्याच संस्थेतून अक्षय ऊर्जा विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्याचे ध्रुव राठी व्लॉग्स नावाचे दुसरे यूट्यूब चॅनलही आहे, जिथे तो त्याचे आंतरराष्ट्रीय प्रवास व्लॉग शेअर करतो. एवढेच नाही तर त्याने डॉयचे वेलेचे डीडब्ल्यू ट्रॅव्हल आणि नेटफ्लिक्स इंडियाज डीकोड विथ ध्रुव सारखे शो होस्ट केले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!