Flight Booking DGCA : तुम्हीही अनेकदा तुमच्या कुटुंबासोबत फ्लाइटने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. एअरलाइन्स रेग्युलेटर डीजीसीएने एअरलाइन्सला नवा आदेश दिला आहे. या आदेशानुसार आता विमान कंपनीला 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना सीट द्यावी लागणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन डीजीसीएने हा आदेश दिला आहे.
डीजीसीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आई-वडील किंवा पालकांसोबत एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या मुलाला एअरलाइनने जागा दिली पाहिजे. डीजीसीएने एअरलाइनला त्यांचे रेकॉर्ड राखण्यास सांगितले आहे. डीजीसीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एअरलाइन्सना त्यांच्या पालकांसोबत प्रवास करणाऱ्या 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना किमान एक सीट दिली जाईल याची काळजी घ्यावी लागेल. त्याच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नोंदीही ठेवल्या जातील.
अलीकडेच 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची परवानगी न दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतर डीजीसीएने हा आदेश दिला आहे. डीजीसीए फ्लाइटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन सातत्याने नियम बनवत आहे. अनेक वेळा हे नियम विमान कंपन्यांकडून पूर्णपणे पाळले जात नाहीत.
हेही वाचा – IPL 2024 : सुनील नरेनचा चाहत्यांना मोठा धक्का! म्हणाला, “आता संघासाठी दरवाजे बंद…”
डीजीसीएने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले पालकांसोबत प्रवास करत असतील तर मुलासोबत एक पालक असेल. सीटसाठी एअरलाइनकडून कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. ऑप्ट इन सेवेअंतर्गत इतर सामानासाठी एअरलाइन्स काही शुल्क आकारू शकतात. एअरलाइन्स मुलांच्या सीटची सक्ती करू शकत नाहीत. जर पालकांनी मोफत सीट किंवा ऑटो ऍलोकेशनचा पर्याय निवडला असेल, तर मुलासाठी समतुल्य सीटची व्यवस्था करावी लागेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा