LLB च्या अॅडमिशनसाठी लढली 24 वर्षाची कायदेशीर लढाई, वयाच्या 66 व्या वर्षी लागला निकाल!

WhatsApp Group

Gujarat : 2000 मध्ये गुजरात विद्यापीठाच्या डीटी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या शशीकुमार मेहता यांना कॉलेजने प्रवेश नाकारला होता. त्याविरोधात त्यांनी 2001 मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात 24 वर्षांनंतर न्यायालयाने मोहतो यांना काही अटींच्या आधारे एलएलबीचा अभ्यास करण्यासाठी पुढील शैक्षणिक कालावधीपासून डीटी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने मोहतो यांचे अपील मान्य करत, महाविद्यालयाच्या सर्व नियमांचे पालन करून तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची परवानगी दिली आहे. तसेच याचिकाकर्त्याच्या कायदेशीर खटल्याचा सर्व खर्च उचलण्यास सांगितले आहे.

शशीकुमार मोहतो यांनी जुलै 2001 मध्ये या महाविद्यालयात तीन वर्षांच्या अभ्यासासाठी अर्ज केला होता, मात्र अर्जाचे शुल्क भरल्यानंतरही त्यांना पावती देण्यात आली नाही. महाविद्यालयाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, गुजरात विद्यापीठाच्या नियमांनुसार प्रवेश घेण्यासाठी 3 वर्षांचा पदवीसह एकूण 15 वर्षांचा अभ्यास असावा, ज्यामध्ये 12 वर्षांचे शालेय शिक्षण समाविष्ट आहे. परंतु उमेदवार मोहतो यांचे केवळ 14 वर्षांचे शालेय शिक्षण झाले. त्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला नाही.

हेही वाचा – IAS अधिकाऱ्याने संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना दिली उभे राहून काम करायची शिक्षा!

याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, 1987-88 मध्ये गुजरात विद्यापीठाच्या नव गुजरात महाविद्यालयात या प्रमाणपत्रासह त्यांना प्रवेश मिळाला होता, परंतु काही कारणांमुळे ते तेथे आपला अभ्यास पूर्ण करू शकले नाही. याचिकाकर्ते मोहतो हे 1980 पर्यंत कोलकाता येथे वास्तव्यास होते आणि तेथे प्रॅक्टिस करत होते. त्यावेळी, 11 वर्षांच्या शालेय शिक्षणानंतर कोलकाता येथे 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम होता. त्यामुळे त्यांना एलएलबीसाठी प्रवेश मिळू शकला. 1979 मध्ये ते गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून ते येथे राहत आहेत. केवळ 12+3=15 वर्षांच्या अभ्यासाच्या आधारे प्रवेश नाकारणे चुकीचे आहे, असेही न्यायालयाने या प्रवेशाला परवानगी देताना म्हटले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment