दिल्लीत खळबळ..! केजरीवाल सरकारचा ‘मोठा’ निर्णय; म्हणाले, “ही राजकारणाची वेळ नाही”

WhatsApp Group

Delhi Schools To Be Shut : दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, उत्तर भारताला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी केंद्राने विशेष पावले उचलण्याची गरज आहे. आता दोषारोप आणि राजकारण करण्याची वेळ नाही.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद राहतील. सम-विषम पद्धत देखील विचारात घेतले जात आहे. गरज भासल्यास, सम-विषम लागू करता येईल. कोणत्याही मुलाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. पाचवीच्या वरच्या मुलांसाठी मैदानी क्रियाकलाप बंद राहतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – भीषण अपघात..! बस-तवेरा कारच्या धडकेत महाराष्ट्रातील ११ कामगार ठार

या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, पंजाबच्या शेतात १.२० लाख यंत्रे तैनात करण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी कोळसा न जाळण्याचा ठराव मंजूर केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment