एक्स्प्रेस वेवर खड्डे पडले, 3 जणांची नोकरी गेली, कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड!

WhatsApp Group

Delhi-Mumbai Expressway : देशातील द्रुतगती मार्ग आणि चांगले रस्ते याबाबत सरकार किती काम करतंय, हे अलीकडच्या निर्णयांवरून दिसून येते. देशातील दोन सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वे प्रकल्पांवर खड्डे पडले. त्यानंतर अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून कंत्राटदाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या प्रकरणात कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आढळले आणि कठोर कारवाई केली. लोकांनी सोशल मीडियावर दोन्ही एक्स्प्रेस वेवर खड्डे पडल्याच्या तक्रारी केल्या होत्या, ज्याची NHAI ने गांभीर्याने दखल घेतली.

ही बाब दिल्ली-वडोदरा एक्स्प्रेस वे आणि अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरशी संबंधित आहे. या दोन्ही द्रुतगती मार्गांवर खड्डे निर्माण झाले होते, त्यामुळे वेगाने जाणाऱ्या गाड्यांना मोठा धोका होता. हा धोका लक्षात घेऊन काही वापरकर्त्यांनी फोटो काढून NHAI ला सोशल मीडियावर टॅग करून तक्रार केली. प्राधिकरणाने संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला तातडीने समस्या सोडविण्यास सांगितले, मात्र या प्रकरणाचा बराच गदारोळ होताच प्राधिकरणाने कठोर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

राजधानी दिल्ली ते गुजरातमधील वडोदरा या द्रुतगती मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याची माहिती ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिली, मात्र त्यांनी रस्ता सुधारण्यास टाळाटाळ सुरूच ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या NHAI ने ठेकेदाराला 50 लाखांचा दंड ठोठावला. एवढेच नव्हे तर कामात निष्काळजीपणा आणि वेळेत समस्या न सोडवल्याबद्दल प्राधिकरणाने संघप्रमुख आणि निवासी अभियंता यांना नोकरीतून बडतर्फ केले. प्रकल्प संचालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. कारवाईनंतर खड्डे तात्पुरते दुरुस्त करण्यात आले असून पावसाळा संपल्यानंतर रस्ता पूर्णपणे दुरुस्त करण्यात येणार आहे.

हेही वाचा – अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : गांजा लीगल होणार? लोकांना काय हवंय?

पंजाबमधील अमृतसर ते गुजरातमधील जामनगरपर्यंत इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवला जात आहे. खड्ड्यांच्या तक्रारी आल्यानंतरही सुधारणा न झाल्याने प्राधिकरणाने कडक कारवाई केली. कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावण्याबरोबरच प्राधिकरणाने संघप्रमुख आणि निवासी अभियंता यांना कामावरून काढून टाकले, तर साईट इंजिनीअरलाही बडतर्फ करण्यात आले. याशिवाय प्रकल्प संचालक व उपव्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या संपूर्ण तपासासाठी, आयआयटी खरगपूरचे प्राध्यापक केएस रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे, जे एक्स्प्रेस वेच्या समस्येची चौकशी करेल आणि ते पूर्णपणे सोडवले जाईल. एक्स्प्रेस वेच्या नमुन्यांची दिल्लीस्थित श्री राम इन्स्टिट्यूटकडून चाचणी केली जात असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. आयआयटी गांधीनगरचे प्रोफेसर जीव्ही राव यांचाही तपास पथकात समावेश आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment