Delhi Man Chops Girlfriend Into 35 Pieces : दिल्लीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्या साथीदाराने हत्या करून मृतदेहाचे अनेक भागात तुकडे फेकले. तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला ५ महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. आरोपीची हत्या केल्यानंतर मुलीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून दिल्लीच्या विविध भागात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे घरात ठेवले होते. यासाठी आफताबने नवीन मोठा फ्रीज घेतला आणि मृतदेहाचे तुकडे १८ दिवस घरात ठेवले. रात्री दोन वाजता तो शरीराचे एक एक तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन फेकून देत असे. आतापर्यंत मृतदेहाचे सुमारे १० ते १५ तुकडे सापडले आहेत.
खून झालेली तरुणी मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावाला याने मुंबईतील मालाड भागातील २६ वर्षीय श्रद्धा वॉकरला लग्नाच्या बहाण्याने दिल्लीत आणले होते. विकास मदन वॉकर (५९) यांनी ८ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले की, ते आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहतात. त्यांची २६ वर्षीय मुलगी श्रद्धा वॉकर ही मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.
हेही वाचा – T20 World Cup 2022 : बटलरनं जिंकली मनं..! सेलिब्रेशन करण्यापूर्वी ‘या’ खेळाडूंना बाजूला केलं; पाहा Video
एक रूह कँपाने वाले मामले में दिल्ली में एक लड़की को उसके बॉयफ्रेंड ने जान से मार दिया और उसके 35 टुकड़े कर फ्रिज में रखे! उसके शव के टुकड़ों को शहर के अलग अलग इलाक़ों में फेंका। समाज में कैसे कैसे दरिंदे पल रहे हैं। पुलिस ने आरोपी को गिरफ़्तार किया है, दरिंदे को कड़ी सजा हो। pic.twitter.com/aMppxvu8zv
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 14, 2022
याच कॉल सेंटरमध्ये श्रद्धाची आफताब अमीनशी भेट झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि ते लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले. या संबंधाची माहिती घरच्यांना कळताच त्यांनी विरोध सुरू केला. कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर श्रद्धा आणि आफताब अचानक मुंबई सोडून गेले. यानंतर ते मेहरौलीच्या छतरपूर भागात राहू लागले.
पण तितक्यात श्रद्धाचा फोन नंबर बंद येऊ लागला. ८ नोव्हेंबर रोजी तिचे वडील छतरपूर येथील फ्लॅटवर गेले जेथे त्यांची मुलगी भाड्याने राहत होती, तेव्हा तेथे कुलूप आढळून आले. यानंतर त्यांनी मेहरौली पोलीस ठाणे गाठून पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी शनिवारी आफताबला पकडले. आफताबने सांगितले की, श्रद्धा अनेकदा त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत असे. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. १८ मे रोजी भांडणात त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून दिल्लीतील विविध भागात फेकून दिले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून श्रद्धाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.