आईच्या पोटातील बाळाच्या हृदयाचे ऑपरेशन..! AIIMS च्या डॉक्टरांची कमाल; ९० सेकंदात दिलं जीवदान!

WhatsApp Group

Heart Surgery On Baby Inside Womb : अनेकदा डॉक्टर रुग्णाला अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतून जिवंत करतात की त्यांना देवाचा दर्जा का दिला गेला हे समजते. आता अशीच एक घटना घडली आहे. राजधानी दिल्लीतील एम्स (AIIMS)रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने महिलेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या द्राक्षाच्या आकाराच्या हृदयावर एक जटिल शस्त्रक्रिया केली आणि आईच्या पोटातच त्याचा आकार बदलला.

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, २८ वर्षीय गर्भवती महिलेला, जिचे तीन गर्भपात झाले होते, तिला तिच्या गर्भाच्या हृदयाच्या स्थितीबद्दल माहिती मिळाल्यावर ती बेशुद्ध झाली. महिलेला गर्भधारणा सुरू ठेवायची होती आणि तिने गर्भाच्या हृदयावर उपचार करण्यास डॉक्टरांना परवानगी देण्याचे मान्य केले.

एम्समधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांसह इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टच्या टीमने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली, ज्याला balloon dilation in obstructed heart valves म्हणतात. अल्ट्रासाऊंड-मार्गदर्शित प्रक्रियेअंतर्गत, गर्भाची सुई त्याच्या हृदयात घातली गेली आणि नंतर फुग्यातील कॅथेटर वापरून ऑब्स्ट्रक्टेड व्हॉल्व्ह उघडण्यात आला. डॉक्टर म्हणाले, “संपूर्ण प्रक्रिया खूप लवकर करायची होती. ते खूप आव्हानात्मक होते. आम्ही ते दीड मिनिटांत करू शकलो.”

डॉक्टर म्हणाले, “या आकार बदलण्याच्या प्रक्रियेमुळे, गर्भाच्या हृदयाचा विकास चांगला होईल अशी अपेक्षा आहे. गर्भ आणि आई दोघेही स्थिर आहेत आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.” केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “मी @AIIMS_NewDelhi येथील डॉक्टरांच्या टीमचे ९० सेकंदात गर्भाच्या द्राक्षाच्या आकाराच्या हृदयावर यशस्वीरीत्या दुर्मिळ प्रक्रिया केल्याबद्दल अभिनंदन करतो. बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.”

याआधीही अनेकवेळा डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. दिल्लीत एका भीषण अपघातात दीड वर्षाचा निरागस बालक साबण आणि पाण्याने भरलेल्या टॉप लोडिंग वॉशिंग मशिनमध्ये पडला. एवढेच नाही तर सुमारे १५ मिनिटे तो त्या पाण्यात बुडून राहिला. सात दिवस तो व्हेंटिलेटरवर कोमात राहिला आणि त्यानंतर १२ दिवस वॉर्डात राहिल्यानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नाने तो चमत्कारिकरित्या बरा झाला.

Leave a comment