जग सोडून गेल्यानंतरही ‘तुफान’ पैसे कमावणारा माणूस म्हणजे मायकल जॅक्सन!

WhatsApp Group

Michael Jackson Lifestyle : संगीत आणि नृत्य जगतातील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार मायकल जॅक्सन यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट १९५८ रोजी झाला. अमेरिकेतील इंडियाना प्रांतात जन्मलेलं हे मूल नंतर किंग ऑफ पॉप म्हणून प्रसिद्ध झालं. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. भावाच्या पॉप ग्रुपमधून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर, जगाचा निरोप घेऊनही आपलं नाव आणि ओळख पुसून टाकू शकणार नाही, अशी यशाचं शिखर त्यानं गाठलं. मायकल जॅक्सन आता या जगात नाही. २००९ साली त्याचं निधन झालं, पण जग सोडून इतक्या वर्षानंतरही मायकल जॅक्सनच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झालेली नाही.

जगातील सर्वात मोठा पॉप स्टार बनलेल्या मायकेल जॅक्सनला जगभरातील चाहत्यांचे केवळ प्रसिद्धी आणि प्रेमच मिळालं नाही, तर तो अगणित संपत्तीचा मालकही बनला. मायकल जॅक्सनची जीवनशैली अप्रतिम होती. मायकल जॅक्सननें आपल्या मागं मोठी संपत्ती सोडली आहे.

हेही वाचा – ४० वर्षांपासून ‘त्यांनी’ केस कापलेले नाहीत, आता वजन झालंय ‘इतकं’ किलो!

मायकेल जॅक्सनचं घर

मायकेल जॅक्सननं नेव्हरलँड रांच ही मालमत्ता सुमारे २० मिलियन डॉलर्स म्हणजेच १६० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत घेतली. हे त्याचं घर बनलं. या घरात लग्नानंतर जॅक्सन पत्नीसोबत राहत होता. मात्र, नंतर आर्थिक अडचणींमुळं त्यानं हे घर टॉम बराक यांना विकलं.

मायकेल जॅक्सनचा कार आणि दुचाकी कलेक्शन

पॉप स्टार मायकल जॅक्सनला गाड्यांची खूप आवड होती. त्याच्याकडं महागड्या आणि आलिशान अशा १४ गाड्या होत्या. २००९ मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा मायकेल जॅक्सनकडं चार लिमोझिन, एक रोल्स रॉयस सिल्व्हर सराफ, रोल्स रॉयस सिल्व्हर स्पर II, लिंकन टाउन कार, कॅडिलॅक फ्लीटवुड, निओप्लान टूर बस, फोर्ड इकोनोलिन व्हॅन, GAC हाय सेरा फायर ट्रक आणि हार्ले डेव्हिडसनची पोलीस दुचाकी होती.

हेही वाचा – नीरज चोप्राचं ‘ब्रम्हास्त्र’ झालं अमर..! ऑलिम्पिक गोल्ड जिंकलेला ‘भाला’ कुठं जाणार? वाचा इथं!

मायकेल जॅक्सनची कमाई

मृत्यूपूर्वी मायकल जॅक्सन शोमधून मोठी कमाई करत असे. संगीताच्या रॉयल्टीच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमावायचा. एक काळ असा होता जेव्हा तो एका आठवड्यात २० मिलियन डॉलर्स कमवायचा. मृत्यूनंतरही त्याची कमाई सुरूच होती. २०१६-१७ च्या अहवालानुसार मायकल जॅक्सननं ५२९ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. मृत्यूनंतरही मायकल जॅक्सन कमाईच्या बाबतीत अनेक वर्षे यादीत अव्वल स्थानावर राहिला.

मृत्यूच्या वेळी मायकेल जॅक्सनची एकूण संपत्ती सुमारे ५०० मिलियन डॉलर्स होती. त्याची भारतीय रुपयांमध्ये एकूण संपत्ती ४ हजार कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, कर्जबाजारी आणि वादग्रस्त मालमत्तेचा मुद्दाही त्याच्याशी जोडला गेला. जरी त्या मालमत्ता बाजूला ठेवल्या गेल्या तरीही मायकेल जॅक्सन खूप श्रीमंत आणि विलासी जीवनाचा मालक होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment