UP Employees DA Hike | होळीपूर्वी राज्यातील योगी सरकारने राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता योगी सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सुमारे 10 लाख सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि 8 लाख शिक्षकांना याचा लाभ होणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
सुमारे 10 लाख कर्मचारी, 8 लाख शिक्षक आणि 12 लाख पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढीचा फायदा होणार आहे. त्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील औपचारिक आदेशही सोमवारी म्हणजेच आज जारी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी केंद्र सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली होती.
हेही वाचा – असं मार्केट, जिथे नवरा-बायको विकत मिळतात..! एकदा हा Video बघाच
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांचा टेक होम पगारही वाढणार आहे, कारण 46 टक्के महागाई भत्त्याऐवजी आता त्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याशिवाय 12 लाख पेन्शनधारकांनाही याचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर 314 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!