VIDEO : आकाशातून करोडो रुपयांचा पाऊस, नोटा जमवण्यासाठी लोकांची पळापळ!

WhatsApp Group

Czech influencer Drops 1 Million Dollar From Helicopter : चेक रिपब्लिकची प्रसिद्ध व्यक्ती आणि टेलिव्हिजन होस्ट कामिल बार्टोशेक याने हेलिकॉप्टरमधून कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडला आहे. कामिलने लिसा नाद लबेम परिसराजवळ हा पाऊस पाडला. काझमा (Kazma Kazmitch) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बार्टोशेकने एका स्पर्धेद्वारे एका भाग्यवान विजेत्याला इतकी मोठी रक्कम देण्याची योजना आखली होती. पैसे जिंकण्यासाठी काझमाच्या ‘वनमॅनशो: द मूव्ही’ या चित्रपटात लपवलेल्या कोडचा उलगडा करणे हे सहभागींसाठी आव्हान होते. हे कोडे सोडवणे फार कठीण होते.

काझमाने यासाठी पर्यायी रणनीती तयार केली. त्याने स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये पैसे वाटण्याचे ठरविले. रविवारी सकाळी, त्याने पैसे कोठे सापडतील याबद्दल एनक्रिप्टेड तपशील असलेला ईमेल पाठवला. काझमाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला जगातील पहिला खरा “पैशाचा पाऊस” म्हटले. चेक रिपब्लिकमधील हेलिकॉप्टरमधून कोणतीही दुखापत किंवा मृत्यू न होता दहा लाख डॉलर्स (रु. 8 कोटी, 32 लाख) टाकण्यात आल्याचे त्याने अभिमानाने जाहीर केले.

हेही वाचा – तरुणाईला वेड लागणार! ‘या’ कंपनीने भुवन बामला बनवलं ब्रँड अॅम्बेसेडर

आकाशातून पैशांचा पाऊस पडताच मैदानात जमलेल्या हजारो लोकांनी एका तासापेक्षा कमी वेळात प्लास्टिकच्या पिशव्या वापरून सर्व नोटा पटकन गोळा केल्या. काही लोकांनी तर छत्र्या वापरून जास्तीत जास्त पैसे गोळा केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment