Cyclone Biporjoy : आज खरी कसोटी! ‘या’ टायमिंगला भारतात धडकणार बायपरजॉय चक्रीवादळ

WhatsApp Group

Cyclone Biporjoy : बायपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत असून, ते अतिशय धोकादायक रूप धारण करत आहे. कच्छच्या जखाऊ येथे आज दुपारी चार ते आठच्या दरम्यान ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पाकिस्तानातही बायपरजॉयची भीती कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बायपरजॉय चक्रीवादळ आज सिंधच्या केटी बंदरला धडकणार आहे.

चक्रीवादळ बायपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीपासून 200 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. सायंकाळपर्यंत टक्कर होईल, असे सांगण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टी आणि वादळाच्या शक्यतेमुळे संवेदनशील भागात राहणाऱ्या 74,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

प्रशासनाने सुमारे 120 गावांतील लोकांना कच्छ जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापासून 10 किमीपर्यंत हलवले आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, बायपरजॉय जखाऊ बंदराजवळ एक अत्यंत तीव्र चक्री वादळ म्हणून 150 किमी प्रतितास वाऱ्याचा वेग गाठेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – PPF की FD? पैसे गुंतवण्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या!

विंग कमांडर एन मनीष यांनी सांगितले की, चक्रीवादळाबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व सशस्त्र दलांनी म्हणजे लष्कर, नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलांनी जनतेला येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी स्वत:ला तयार केले आहे. स्थानिक जनतेला सर्वतोपरी मदत करण्यास तो तयार आहे. त्यांनी माहिती दिली की भारतीय लष्कराने संपूर्ण गुजरातमध्ये तसेच मांडवी आणि द्वारका येथे 27 हून अधिक मदत स्तंभ तैनात केले आहेत. लष्कराच्या अधिकार्‍यांनी नागरी प्रशासन तसेच एनडीआरएफच्या पथकांसोबत संयुक्तपणे मदतकार्य सुरू केले आहे.

बायपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. समुद्राचे पाणी किनाऱ्यालगत असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. स्थानिक लोक आणि मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment