Bhopal Airport Garba Dance : भोपाळहून अहमदाबादला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला उशीर झाल्याने एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी विमानतळावरच प्रवाशांसोबत गरबा खेळायला सुरुवात केली. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला सीआयएसएफ कर्मचारी देखील यात सामील झाल्या. यावेळी ढोलिडा ढोल रे या गुजराती गरबा गाण्यावर सर्वांनी जोरदार नृत्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E 7569 भोपाळच्या राजा भोज विमानतळावरून अहमदाबादहून साधारणपणे ६.४५ वाजता सुटते. सोमवारी विमान नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने सुटणार होते.
विलंबामुळे प्रवाशांना डिपार्चर गेट क्रमांक एकवर थांबण्यास सांगण्यात आले. दरम्यान, एका प्रवाशाने आपल्या मोबाईलवर गुजराती गरबा गाणे सुरू केले. गाणे वाजताच प्रवासी सीटवरच डोलायला लागले. काही वेळातच इंडिगोच्या काही कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या जागेवरून उठून गरबा खेळायला सुरुवात केली. सीआयएसएफच्या महिला कर्मचारीही यात सामील झाल्या. त्याचा एक व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सर्व लोक एकमेकांसोबत गरबा खेळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.
हेही वाचा – मोठी बातमी..! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, ठाकरे गट विरुद्ध भाजप!
Flight late
So
don't wait
&
Do Garba
On
Exit gateDue to the delay of Ahmedabad flight at Bhopal airport on the last day of Navratri, for the first time inside the airport, air hostess, airport staff all started enjoing Garba on Main gate of in side Exit area of Bhopal AirPort pic.twitter.com/wFxCPiUm5d
— Govind Gurjar ('भोजपाली') (@Gurjarrrrr) October 3, 2022
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!