Coronavirus : चीनमध्ये झपाट्याने वाढत असलेली कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा जगभरात चिंतेचा विषय बनत आहेत. चीनमधील परिस्थिती पाहता भारत सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज कोरोनाबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ‘आंतरराष्ट्रीय परिस्थिती’ लक्षात घेऊन, मनसुख मांडविया कोरोना महामारीवर बैठक घेत आहेत, ज्यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष विभाग, आरोग्य विभाग, फार्मास्युटिकल्स, बायोटेक्नॉलॉजी, आयसीएमआरचे महासंचालक राजीव बेहर, नीति आयोगाचे सदस्य यांच्यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित राहू शकतात.
आरोग्य मंत्रालयानं राज्यांना सांगितलं…
मंगळवारी (२० डिसेंबर), आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या नोंद झालेल्या प्रकरणांचे नमुने INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगितले, जेणेकरून हे कळू शकेल की तेथे नक्की कोरोनाचा कोणता व्हेरिएंट आहे. दुसरीकडे, जर नवीन प्रकार समोर आला, तर त्याचा मागोवा घेता येईल.
Corona horror started in China @ani pic.twitter.com/QupsKSHjnG
— Space (@KrishanIndia) December 19, 2022
हेही वाचा – Bank Of Maharashtra Recruitment 2022 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी..! जाणून घ्या कशी होईल भरती
ये दर्दनाक तस्वीरें चीन की है। जानकारी के मुताबिक #corona महामारी से 20-30 लाख चीनी नागरिकों की मौत हो गई है। चीन के हालात इतने भयावह है शवदाह के लिए 20 से 72 घंटे का इंतज़ार करना पड़ रहा है #chinacovid #China #coronavirus pic.twitter.com/vbhPSImxRp
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) December 20, 2022
चीनमध्ये संकट
चीनमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत वाईट आहे. महामारी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील ९० दिवसांत चीनमधील ६० टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात येईल. यासोबतच वेगाने पसरणाऱ्या संसर्गामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही सांगण्यात आले. चीनमधून समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहांचा ढीग दिसत होता. एकाच वेळी सुमारे वीस मृतदेह जमिनीवर दिसले. शवागार पूर्ण भरल्यावर मृतदेह हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये हलवण्यात आले. तसेच अंत्यविधी गृहात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास बराच वेळ लागत आहे.