Odisha Train Accident : भारतातील भयानक ट्रेन अपघात…! 280 जणांचा मृत्यू, 900 हून अधिक जखमी

WhatsApp Group

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसर्‍या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. पीटीआय या वृत्तसंस्थेने रात्री उशिरा जारी केलेल्या अपडेटनुसार, या अपघातात आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्टेशनवरून चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बाहानगा बाजार स्थानकावर संध्याकाळी 7.20 च्या सुमारास हा अपघात झाला. दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मदत गाड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर तातडीने बचाव मोहीम राबवून 300 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

या अपघाताबाबत कोरोमंडल एक्स्प्रेसच्या एका प्रवाशाने सांगितले की, अपघात झाला तेव्हा आम्ही S5 बोगीत होतो आणि मी झोपेत होतो. कुणाचे डोकं, हात, पाय नसल्याचं पाहिलं. आमच्या सीटखाली एक 2 वर्षाचा मुलगा होता जो पूर्णपणे सुरक्षित आहे. नंतर आम्ही त्याच्या कुटुंबीयांची सुटका केली.

ओडिशा रेल्वे अपघाताचा सर्वाधिक फटका शालीमार स्थानकावरून चेन्नईला निघालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसला बसला. हा दुर्दैवी योगायोग आहे की 2009 मध्येही शुक्रवारी कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला होता.

ओडिशा रेल्वे अपघातातील बचावकार्याची प्रगती जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भीषण रेल्वे अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा – तुमच्याकडे आहे 2000 रुपयांची फाटलेली नोट? एक्सचेंज करून मिळतील इतके!

मोदींनी बोलावली बैठक

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, सर्वात मोठी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालासोर ट्रेन दुर्घटनेवर विशेष बैठक बोलावली आहे. अपघाताच्या ताज्या परिस्थितीबाबत ते चर्चा करतील. या रेल्वे अपघातानंतर आतापर्यंत ४२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 38 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.  

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment