केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची मुलगी गोव्यात चालवतेय बेकायदेशीर बार? नाव आहे…

WhatsApp Group

मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी झोईश इराणीनं गोव्यात ‘बेकायदेशीर बार’ चालवल्याचा आरोप झाला. आता काँग्रेस पक्षानं गोव्यातील कोरजू गावात स्मृती इराणी यांच्या नावावर आलिशान घर शोधल्याचा ‘मोठा खुलासा’ केला आहे. काँग्रेस मीडिया प्लॅटफॉर्म INC टीव्हीनं एका ट्वीटमध्ये दावा केला आहे की हे घर सिली सोल बारपासून फक्त १० किमी अंतरावर आहे. याचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. यातील एका फोटोत झोईश इराणी हे नाव वाचले जाऊ शकते. दुसऱ्या फोटोत ६५ लाखांची माहिती आणि घराचा पत्ता दिसत आहे.

आज सकाळी दुसर्‍या ट्वीटमध्ये INC टीव्हीनं स्मृती इराणी यांच्या मुलीनं तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचा दावा करणारा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या अकाऊंटवर गोवा बारबाबत अनेक फोटो असल्याचे पुढे सांगण्यात आलं आहे. गोवा बारचा मुद्दा जेव्हापासून काँग्रेसनं उचलून धरला आहे, तेव्हापासून अनेक गोष्टी समोर येत आहेत. काँग्रेसच्या आरोपांवर झोईशनं म्हटलं, की ती ‘सिली सोल्स कॅफे अँड बार’ नावाच्या रेस्टॉरंटची मालकीण नाही.

स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यामध्ये ‘बेकायदेशीर बार’ चालवल्याचा आरोप काँग्रेसनं केला. पवन खेरा म्हणाले, ”केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. गोव्यात त्यांची मुलगी चालवणार्‍या रेस्टॉरंटवर दारू देण्यासाठी बनावट परवाने दिल्याचा आरोप आहे.”

काय म्हणाल्या स्मृती इराणी?

या गोष्टीबाबत स्मृती इराणी म्हणाल्या, ”माझ्या मुलीची चूक आहे की तिच्या आईनं सोनिया आणि राहुल गांधींच्या पाच हजार कोटींच्या लुटीबाबत पत्रकार परिषद घेतली. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तिच्या आईनं राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली हा तिचा दोष आहे. माझी १८ वर्षांची मुलगी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे आणि ती बार चालवत नाही.”

काँग्रेसने आपल्या मुलीला लक्ष्य केल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसला आव्हान दिले की त्यांनी आपल्या मुलीनं केलेल्या चुकीचे पुरावे दाखवावे. महिला आणि बालविकास मंत्री इराणी यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेल्या कथित नोटिसांमध्ये त्यांच्या मुलीचे नाव आहे का, असा सवाल केला.

Leave a comment