‘‘तुम्हाला तुमच्या पालकांना आयुष्यभर से*क्स करताना पाहायचंय की एकदा त्यात सामील होऊन…”

WhatsApp Group

India’s Got Latent : पुन्हा एकदा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो वादात सापडला आहे. या शोचा होस्ट इन्फ्लुएंसर समय रैना असून अलिकडच्या भागात, रणवीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा आणि आशिष चंचलानी हे या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. रणवीर आणि अपूर्वाने एका स्पर्धकाला इतका अश्लील प्रश्न विचारला की त्यामुळे बराच गोंधळ उडाला. आता या प्रकरणी आयोजक आणि पाहुण्यांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विधान समोर आले आहे.

समय रैना, रणवीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा आणि आशिष चंचलानी यांच्यावर लोक खूप संतापले आहेत. हा भाग प्रसारित झाल्यापासून लोक कारवाईची मागणी करत होते. तसेच डार्क कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. आता पोलिसांना समय रैना आणि रणवीर इलाहाबादिया आणि इतरांविरुद्ध तक्रार मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांचे निवेदन अद्याप समोर आलेले नाही.

फडणवीस म्हणाले….

या मुद्द्यावरील वाढता वाद पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, ‘मलाही याबद्दल माहिती मिळाली आहे. गोष्टी अतिशय कुरूप पद्धतीने चालवल्या जात आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वैचारिक स्वातंत्र्य सर्वांना आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला हानी पोहोचवतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. हे बरोबर नाही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात, आम्ही अश्लीलतेसाठीही नियम ठरवले आहेत. जर कोणी त्या ओलांडल्या तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.’

झालं असं की शो दरम्यान रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं, ‘तुम्हाला तुमच्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पहायला आवडेल का?’ किंवा तुम्ही त्यांच्यात सामील व्हाल?.’ युट्यूबर म्हणून प्रसिद्ध झालेल्या रणवीर इलाहाबादियाला पालकांबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर खूप ट्रोल करण्यात आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!  

Leave a comment