गूड न्यूज..! सर्वांच्या प्रार्थनेला यश; कॉमेडियन राजू श्रीवास्तवबाबत ‘मोठं’ अपडेट!

WhatsApp Group

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून कोमात होता आणि त्याचे चाहते त्याच्यासाठी सतत प्रार्थना करत होते. चाहत्यांच्या प्रार्थनेनं आता मोठी कामगिरी केली आहे. १५ दिवसांनंतर राजू श्रीवास्तव पुन्हा शुद्धीवर आला आहे. राजूला १० ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गरवीत नारंग यांनी त्याच्या प्रकृतीत सातत्यानं सुधारणा होत असल्याचं म्हटलं आहे. गेल्या १५ दिवसांपासून राजू श्रीवास्तव याच्या प्रकृतीबाबत सातत्यानं दु:खद बातम्या येत होत्या, मात्र त्यांचे चाहते सतत प्रार्थना करत होते.

न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, राजू श्रीवास्तवला १५ दिवसांनी शुद्धी आली आहे. १० ऑगस्ट रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताज्या अहवालानुसार, राजू श्रीवास्तवचे पर्सनल सेक्रेटरी गरवीत नारंग यांनी ही गूड न्यूज दिली. डॉक्टर राजूच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला.

हेही वाचा – मुंबईत रिक्षा चालवताना ‘ब्रेक’ मिळाला आणि राजू श्रीवास्तव पुढं कॉमेडी किंग ठरला!

राजूचे जवळचे मित्र आणि कॉमेडियन सुनील पालनं एका वृत्तसंस्थेला माहिती दिली, की ‘राजू जी कुटुंबीय अनेक दिवसांपासून या वेळेची वाट पाहत होते आणि अखेर राजूभाईंना शुद्ध आली आहे. म्हणजेच देवानेही राजूभाई आणि त्यांच्या चाहत्यांच्या हास्याला गंभीर होऊ दिलं नाही. राजू श्रीवास्तव गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडले गेला आहे. तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमुळं त्यांची लोकप्रियता खूप वाढली. तो प्रेक्षकांमध्ये कॉमेडीचा समानार्थी शब्द म्हणून उदयास आला होता. त्यांनी अनेक संस्मरणीय बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

राजू श्रीवास्तवच्या खास गोष्टी…

राजू श्रीवास्तव हा मूळचा कानपूर, उत्तर प्रदेशचा असून त्याचं खरं नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. राजू श्रीवास्तवचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी होते, राजू लहानपणापासूनच उत्तम नक्कल करणारा कलाकार आहेत आणि त्यानं लहान वयातच ठरवलं होतं की त्याला विनोदी कलाकार व्हायचं आहे. राजूनं अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या तेजाब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

राजूनं १९८८ मध्ये ‘तेजाब’ या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात राजूचा मात्र कॅमिओ होता. यानंतर तो मैंने प्यार किया, बाजीगर, मिस्टर आझाद, आम अठन्नी खरचा रुपैया, मैं प्रेम की दीवानी हूं, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमध्ये दिसला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment