CNG Price Hike : ‘या’ कंपनीनं वाढवले सीएनजीचे दर..! ‘हा’ आहे नवा रेट

WhatsApp Group

CNG Price Hike : अदानी टोटल गॅस लिमिटेडने गुजरातमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमती १ रुपये प्रति किलोने वाढवल्या आहेत. नवीन किमती सोमवारपासून म्हणजेच ९ जानेवारी २०२३ पासून लागू झाल्या आहेत. वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत फेडरेशन ऑफ गुजरात पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद ठक्कर म्हणाले की आता गॅसची किंमत ७९.३४ रुपयांवरून ८०.३४ रुपये प्रति किलो झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच गुजरात गॅसने पाईपद्वारे घरोघरी पोहोचणाऱ्या सीएनजी आणि एलपीजी (पीएनजी) च्या किमतीत ३.५ रुपयांनी वाढ केली होती. १ किलो गुजरात गॅस सीएनजीची किंमत आता ७८.५२ रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या PNG ची किंमत ५०.४३ SCM (स्टँडर्ड क्यूबिक मीटर) वर गेली आहे.

शेअर्समध्ये तेजी

आज अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही तेजी होती. सोमवारी स्टॉकची सुरुवात चांगली झाली, मात्र दुपारपर्यंत त्यात काहीशी घसरण झाली. तथापि, बाजाराच्या शेवटच्या काही तासांत, अदानी टोटल गॅसच्या समभागांनी जबरदस्त उडी मारली आणि २.०७ टक्के किंवा ७३.६० रुपयांच्या वाढीसह ३६२९ रुपयांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात या समभागाने रु.३६६६ ची पातळी गाठली.

हेही वाचा – Vistara Sale : यापेक्षा स्वस्त काही नाही..! फक्त १८९९ रुपयात विमानप्रवास; ‘अशी’ करा बुकिंग!

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन

अलीकडेच अदानी टोटल गॅसला आठ शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन (ईव्ही चार्जिंग स्टेशन) उभारण्याचे आदेश मिळाले होते. या शहरांची नावे आहेत – दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि सुरत. या शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासोबतच कंपनी चाचणी, सुरू करणे, ऑपरेशन आणि देखभालीची कामेही करणार आहे. कंपनीने अहमदाबादमध्ये पहिले ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारून या क्षेत्रात प्रवेश केला होता. कंपनीचे म्हणणे आहे की देशात १५०० ईव्ही चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

अदानी टोटल गॅसबद्दल

ही अदानी समूहाची कंपनी आहे. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी गॅसची स्थापना २००५ मध्ये झाली आणि २०२१ मध्ये त्याचे नाव बदलून अदानी टोटल गॅस असे करण्यात आले. २०१९ मध्ये, इंटरनॅशनल एनर्जी कंपनी टोटलने अदानी गॅसचे ३७ टक्के शेअर्स खरेदी केले. देशातील अनेक राज्यांमध्ये अदानी गॅस पाइप्ड नॅचरल गॅसचा (पीएनजी) पुरवठा करते.

Leave a comment