इटलीच्या क्लेमेंटे डेल वेचियो (Clemente Del Vecchio) याने फोर्ब्सच्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. वयाच्या फक्त 19 व्या वर्षी तो जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनला. क्लेमेंटेचे वडील लिओनार्डो डेल वेचियो हे जगातील सर्वात मोठी चष्मा कंपनी Essilorluxottica एसिलोरलग्जोटिकाचे अध्यक्ष होते. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांचे निधन झाले. क्लेमेंटच्या वडिलांची एकूण संपत्ती $25.5 अब्ज होती. त्यांची पत्नी आणि सहा मुलांना ही मालमत्ता वारसाहक्काने मिळाली. क्लेमेंटेला त्याच्या वडिलांच्या लक्झेंबर्गस्थित कंपनी डेल्फिनमध्ये 12.5% हिस्सा मिळाला आहे.
अजूनही शिकतोय क्लेमेंटे
फोर्ब्सच्या अहवालानुसार, क्लेमेंटेची एकूण संपत्ती $4 अब्ज आहे. क्लेमेंटे अजूनही अभ्यास करत आहे. त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानात रस आहे असून याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण इतकी प्रचंड संपत्ती असूनही, क्लेमेंटे अत्यंत साधा राहतो. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे इटलीमध्ये अनेक लक्झरी प्रॉपर्टी आहेत. त्याचा लेक कोमोवर एक व्हिला आणि मिलानमध्ये एक अपार्टमेंट आहे.
हेही वाचा – एखाद्याचा Health Insurance क्लेम रिजेक्ट का होतो? काय कारणे असू शकतात?
क्लेमेंटे वेचियोचा मोठा भाऊ क्लॉडिओ प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या 25 व्या वर्षी 1982 मध्ये अमेरिकेला पाठवले. 15 वर्षे, त्यांनी यूएस मध्ये Essilorluxottica चे मॅनेजमेंट पाहिले आणि 1995 मध्ये $1.4 बिलियन मध्ये Lenscrafters सारखे उल्लेखनीय अधिग्रहण केले. 2001 मध्ये, क्लॉडिओने ब्रूक्स ब्रदर्सला $225 दशलक्षमध्ये खरेदी केले.
आजोबा भाजी विकायचे
नंतर त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आणि जुलै 2020 मध्ये दिवाळखोर घोषित करण्यात आले. क्लेमेंटेचा दुसरा मोठा भाऊ, लिओनार्डो मारिया, कौटुंबिक व्यवसायात गुंतलेला आहे, जो Essilorluxottica साठी इटलीमधील रिटेल क्षेत्रात आघाडीवर आहे. विशेष म्हणजे क्लेमेंटचे आजोबा मिलानमध्ये भाजी विकायचे हे अनेकांना माहीत नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!