CISF Jawan Saves Passenger’s Life : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर एका CISF जवानाने ‘देव’ बनून एका प्रवाशाचे प्राण वाचवले. प्रत्यक्षात प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तो जमिनीवर पडला आणि त्याला त्रास होऊ लागला. विमानतळावर तैनात असलेल्या एका सीआयएसएफ जवानाने त्याला पाहिले. यानंतर जवानाने प्रवाशाकडे धाव घेतली आणि सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी भाजप (भारतीय जनता पार्टी) नेते सुनील देवधर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तो शेअर केला. त्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता लोक CISF जवानाचे खूप कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेक युजर्सनी जवानाला देव तर काहींनी देवदूत म्हटले.
हेही वाचा – IPL 2023 Auction : सॅम करन ठरला महागडा खेळाडू..! रहाणेला मिळाला ‘नवा’ संघ; मुंबईचा मास्टरस्ट्रोक!
Prompt action of CISF Jawan's saved a life at @ahmairport.
Salute to this great force 🙏 pic.twitter.com/miBP4g8Ft6— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) December 22, 2022
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विमानतळ व्यवस्थापनानेही जवानाचे कौतुक केले. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रवासी अहमदाबादहून मुंबईला जात होते. सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. सीआयएसएफ जवानाने सीपीआर दिल्यानंतर प्रवाशाचा श्वास परत आला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स सतत त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. लोक सीआयएसएफ जवानासह आणखी एका व्यक्तीचे कौतुक करत आहेत.