चोर आले आणि चॉकलेट चोरून गेले..! किंमत होती १७ लाख; नक्की वाचा!

WhatsApp Group

Lucknow Chocolates Robbery : लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक, लखनऊमधील एका गोदामातून चोरट्यांनी एका ब्रँडेड चॉकलेट बारच्या सुमारे १५० कार्टन चोरल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये चोरट्यांनी पैसे नव्हे तर चॉकलेट चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी लखनऊमधील चिन्हाटमधील देवराजी विहार परिसरात कॅडबरी कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी १७ लाख रुपयांची चॉकलेट्स चोरून नेली. एवढंच नाही तर आपली ओळख उघड होऊ नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआरही सोबत नेले.

कधी झाली चोरी?

वास्तविक, ही घटना १५ ऑगस्टच्या रात्रीची असून, देवराजी विहार परिसरातील कॅडबरी कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी १७ लाख रुपयांची चॉकलेट आणि बिस्किटं पळवली होती. सध्या या प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करून १७ लाख रुपयांच्या चॉकलेटचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा – अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

दरम्यान, कॅडबरीचे वितरक राजेंद्र सिंह सिद्धू यांनी सांगितलं, की आम्ही चिन्हाट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, कोणाला काही माहिती असल्यास कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. एफआयआरनुसार, ओमॅक्स सिटीमध्ये राहणारे व्यापारी राजेंद्र सिंह सिद्धू हे कॅडबरी डीलर आहेत आणि गेल्या दोन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत आहेत.

कशी झाली चोरी?

राजेंद्र सिंह सिद्धू यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, त्यांनी देवराजी विहार भागात असलेल्या त्यांच्या घरी गोदाम बनवलं आहे. १५ ऑगस्टच्या रात्री शेजाऱ्यांनी गोडाऊनचे आतील दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली. रात्री एका पिकअप ट्रकचा शेजाऱ्यांनी ऐकला आणि त्यांना वाटलं, की सिद्धू काही साठा घेण्यासाठी आले आहेत. त्यानंतर शेजाऱ्यांनी गोदामातून चोरी झाल्याचं पाहिलं. गोदामातून सुमारे १७ लाख रुपये किमतीची कॅडबरीची चॉकलेट्स आणि बिस्किटं गायब होती. एवढंच नाही तर चोरट्यांनी उबदार कपडे, कॅमेरा, डीव्हीआर, हँडीकॅमही चोरून नेले. हे चॉकलेट्स शहरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरित केले जाणार होते.

हेही वाचा – BREAKING..! बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अटक होणार?

आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याशिवाय परिसरातील इतर भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात येत आहे. चिन्हाटचे निरीक्षक तेज बहादूर सिंह यांनी सांगितलं, की आयपीसीच्या कलम ३८० सोबत इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी राहणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे, लवकरच चोरांना पकडलं जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment