महिलेचा जिवंत ज्वालामुखीत पडून मृत्यू! फोटोसाठी पोज देताना पाय घसरला

WhatsApp Group

Chinese Woman Into Indonesian Volcano : फोटोसाठी पोज देण्याचे लोकांचे वेड धोकादायक मर्यादेपर्यंत जाते आणि काहीवेळा त्यांच्यासाठी घातक देखील ठरते. इंडोनेशियामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे ज्वालामुखीच्या खोल विवराजवळ फोटोसाठी पोज देत असलेली चिनी महिला घसरली आणि 75 फूट खोल जिवंत ज्वालामुखीत पडली. कसेबसे तिला बाहेर काढले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हुआंग लिहोंग (31) नावाची चीनी महिला आपल्या पतीसोबत इंडोनेशियाला टूरवर गेली होती. या जोडप्याने इजेन ज्वालामुखीच्या विवरावर उभे राहून सूर्योदय पाहण्याची योजना आखली. यासाठी हे जोडपे गाईडसह ज्वालामुखी टुरिझम पार्कमध्ये पोहोचले. यानंतर पती-पत्नी वर चढले आणि ज्वालामुखीच्या मुखाजवळ पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इजेन ज्वालामुखीच्या विवराजवळ उभे राहून फोटो काढण्यास बंदी आहे. त्यांच्यासोबत आलेला टूर गाईड या जोडप्याला खड्ड्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला देत होता. सुरुवातीला या जोडप्याने त्याच्या सूचनांचे पालन केले. यानंतर महिला फोटोसाठी पोज देण्यासाठी मागे सरकली. यावेळी तिचा पाय घसरला आणि ती 75 फूट खोल ज्वालामुखीत पडली.

हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता! IMD चा इशारा, वाचा कोकणात काय होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पडताच एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि ज्वालामुखीच्या आतून महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर महिलेला बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत इतक्या उंचीवरून पडल्याने तिचा मृत्यू झाला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment