Diabetes : खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा गंभीर आणि जुनाट आजारांपैकी एक मानला जातो. साधारणपणे मधुमेहाचे दोन प्रकार असतात, टाइप-1 आणि टाइप-2. टाइप-1 मधुमेहाच्या बाबतीत रुग्णांच्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होत नाही. अशा परिस्थितीत या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घेत राहावे लागते. त्याचबरोबर टाइप-2 मधुमेह जीवनशैली आणि आहारावर नियंत्रण ठेवता येतो. आता टाइप-1 मधुमेहावरील उपचाराबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे ‘टाइप-1’ मधुमेहाच्या रुग्णाला बरे करण्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला असून जगभरातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे.
चिनी वृत्तपत्र ‘द पेपर’च्या रिपोर्टनुसार, 25 वर्षांची एक महिला अनेक दिवसांपासून टाइप-1 मधुमेहाने त्रस्त होती. अशा परिस्थितीत चिनी शास्त्रज्ञांनी तिचे स्टेम सेल प्रत्यारोपण केले. सुमारे अडीच महिन्यांच्या या शस्त्रक्रियेनंतर या महिलेची शुगर लेव्हल नियंत्रणात आली. हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या शस्त्रक्रियेला फक्त अर्धा तास लागला.
स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे मधुमेह नियंत्रित करणाऱ्या टीमने गेल्या आठवड्यात ‘सेल’ जर्नलमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. अहवालानुसार, ‘टियांजिन फर्स्ट सेंट्रल हॉस्पिटल अँड पेकिंग युनिव्हर्सिटी’चे संशोधकही या अभ्यासात सहभागी झाले होते.
हेही वाचा – Women’s T20 World Cup 2024 : आजपासून वर्ल्डकप! जाणून घ्या मॅच टायमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंग आणि भारताचे सामने
आत्तापर्यंत, टाइप-1 मधुमेहाच्या रूग्णांना बरे करण्यासाठी, मृत दात्याच्या स्वादुपिंडातून आयलेट पेशी काढल्या गेल्या आणि टाइप-1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रत्यारोपण केले. स्वादुपिंडातील ‘आयलेट’ पेशी ‘इन्सुलिन’ आणि ‘ग्लुकागन’ सारखे हार्मोन्स तयार करतात, जे रक्तातील ‘ग्लुकोज’ची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मात्र, दात्याच्या कमतरतेमुळे ते करणे कठीण होत होते.
संशोधकांचे म्हणणे आहे की आता स्टेम सेल थेरपीने मधुमेहावरील उपचारांसाठी नवीन शक्यता उघडल्या आहेत. या उपचार प्रक्रियेमध्ये रासायनिक प्रेरित प्लुरिपोटेंट स्टेम-सेल-व्युत्पन्न आयलेट्स किंवा सीआयपीएससी आयलेट्स वापरतात. या प्रक्रियेत रुग्णाकडून पेशी घेतल्या जातात आणि त्यात काही रासायनिक बदल केले जातात. त्यानंतर ते पुन्हा रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!