अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे किती संपत्ती आहे?

WhatsApp Group

1993 मुंबई बॉम्बस्फोट आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डॉन दाऊद इब्राहिम (67 वर्ष) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कराचीमध्ये दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची बातमी समोर आली, मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दाऊद गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला असून येथून तो जगभरात आपला अवैध धंदा चालवत आहे. (Dawood Ibrahim Net Worth)

दाऊदचा बेकायदेशीर धंदा जगातील अनेक देशांमध्ये पसरला असून, त्याने हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्याची पत्नी मेहजबीन आणि भाऊ अनीस हे मिळून दाऊद इब्राहिमचा व्यवसाय चालवतात, असे काही अहवाल सांगतात. द गार्डियनच्या वृत्तानुसार, 1980 आणि 1990 च्या दशकात दाऊद इब्राहिमने वेश्याव्यवसाय, जुगार आणि ड्रग्जच्या व्यवसायातून अब्जावधी रुपयांचा काळा पैसा जमा केला. आता दाऊद इब्राहिम डी कंपनी या जागतिक दहशतवादी संघटनेचा प्रमुख मानला जातो.

दाऊद इब्राहिमकडे किती संपत्ती?

फोर्ब्सच्या मते दाऊद इब्राहिम हा आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत गुंडांपैकी एक आहे. 2015 मध्ये, फोर्ब्सने दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज यूएस डॉलर (सुमारे 55 हजार कोटी रुपये) असल्याचा अंदाज वर्तवला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार दाऊदची पाकिस्तानी शहरात 3 आलिशान घरेही आहेत. दाऊद कराचीच्या डी-13, ब्लॉक-4, क्लिफ्टनमध्ये 6,000 स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेल्या आलिशान बंगल्यात राहत असल्याचा दावा केला जात आहे. येथे कराचीचा नो-ट्रेपास झोन आहे आणि त्यावर पाकिस्तानी रेंजर्सचा कडक पहारा आहे.

दाऊदची देशातील अनेक शहरांमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समजते. दाऊदच्या नावावर एक हॉटेल (दाऊद इब्राहिम हॉटेल) देखील आहे, जे आता जप्त करण्यात आले आहे. दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यात मुंबई आणि इतर शहरातील मालमत्तांचा समावेश आहे. दाऊदची दुबईतही अनेक मालमत्ता आहेत. दाऊदकडे मुंबईत ह्युंदाई एक्सेंट सेडान कारही होती, जी सरकारने जप्त केली आहे.

हेही वाचा – IPL 2024 Auction लाइव्ह पाहा, तेही एकदम FREEE!

दाऊद इब्राहिमला क्रिकेट पाहण्याची खूप आवड होती. मॅच बघण्यासोबतच तो बेटिंगही करायचा, नंतर तो मॅच फिक्स करायला लागला. त्याचे नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते. याशिवाय टूजी स्पेक्ट्रमसह अनेक घोटाळ्यांमध्ये दाऊदचा हात आहे. 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याव्यतिरिक्त दाऊद इब्राहिमचे ओसामा बिन लादेन आणि अल कायदा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या अयमान अल-जवाहिरी यांच्याशीही जवळचे संबंध होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आयएस आणि अल-कायदा प्रतिबंध समितीने दाऊदला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.

ब्रिटनमध्येही मालमत्ता

दाऊद इब्राहिमची युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये पसरलेल्या डझनहून अधिक देशांमध्ये संपत्ती आहे. एकट्या ब्रिटनमध्ये त्याच्याकडे US$ 450 मिलियन इतकी संपत्ती आहे. दाऊदने जगभरातील देशांमध्ये 50 हून अधिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे. दाऊद इब्राहिमचा व्यवसाय भारत, पाकिस्तान, ब्रिटन, जर्मनी, तुर्की, फ्रान्स, स्पेन, मोरोक्को, सायप्रस, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत पसरलेला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment