देशातील सर्वात स्वस्त फ्लाइट! अवघ्या 150 रुपयांत विमानप्रवास; जाणून घ्या सविस्तर…

WhatsApp Group

Cheapest Flight Ticket : आजच्या काळात विमान तिकिटांच्या किमती खूप वाढल्या आहेत. जर तुम्ही देशातील महानगरांदरम्यान विमानाने प्रवास करत असाल तर तुम्हाला तिकिटासाठी किमान 6-7 हजार रुपये मोजावे लागतील. पण तुम्हाला माहीत आहे का की देशात एक असे राज्य आहे, जिथे तिकीटाची किंमत 5 किंवा 6 हजार रुपये नाही, तर केवळ 150 रुपये आहे. होय, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु एक विमान कंपनी आहे, जी स्थानिक विमान प्रवासासाठी प्रवाशाकडून फक्त 150 रुपये आकारत आहे. तिकिटे इतकी स्वस्त असल्याने या फ्लाईटमधील सीट्स भरलेल्या असतात.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेंतर्गत अलायन्स एअर या विमान कंपनीकडून 150 रुपयांमध्ये उड्डाणाची सुविधा दिली जात आहे. हे विमान तेजपूर ते लखीमपूर जिल्ह्यातील लीलाबारी विमानतळावर चालते. कंपनीच्या या मार्गावर दररोज दोन उड्डाणे आहेत, जी दोन महिन्यांपासून जवळपास पूर्ण भरत आहेत.

चार तासांचा प्रवास 25 मिनिटांत

तेजपूर ते लीलाबारी बसने गेल्यास 216 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 4 तास लागतात. तर या मार्गावरील हवाई अंतर केवळ 147 किलोमीटर असून ते उड्डाणाने अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण केले जाते. या प्रवासाचे एकेरी भाडे 150 रुपये आहे. या मार्गावरील कोलकाता मार्गे फ्लाइटचे भाडे 450 रुपये आहे. जेव्हापासून येथे कमी किमतीची विमानसेवा सुरू झाली, तेव्हापासून तिच्या 95% जागा भरल्या आहेत.

2017 मध्ये सुरू झालेल्या ‘उडान’ला ईशान्येत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आसाम, मेघालय, नागालँड, अरुणाचल, सिक्कीमच्या 73 हवाई पट्ट्या या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत. अलायन्स एअर, फ्लायबिग, इंडिगो येथे सेवा देत आहेत. या योजनेअंतर्गत 2021 मध्ये इम्फाळ ते शिलाँग थेट विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा – बँकेत जाण्याची गरज नाही, आता आधारच्या माध्यमातून घरबसल्या लगेच मिळतील पैसे!

एवढं स्वस्त कसं?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरील भाडे परवडणारे करण्यासाठी, विमान कंपन्यांना UDAN योजनेंतर्गत व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) दिले जात आहे. यामुळे कंपनीला मूळ भाड्यातील नुकसान भरपाई मिळते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment