

Cheapest Dual Channel ABS Bike : एबीएस किंवा अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमचा वापर वाहनांमध्ये ब्रेकिंग करताना वाहनाची चाके लॉक होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. बाईकमध्ये दोन प्रकारचे ABS देण्यात आले आहेत – सिंगल चॅनल ABS आणि ड्युअल चॅनल ABS. कॉस्ट कमी करण्यासाठी कंपन्या सिंगल चॅनल ABS देतात पण आज आम्ही तुम्हाला देशातील ५ स्वस्त बाइक्सबद्दल सांगणार आहोत ज्या ड्युअल-चॅनल ABS सह येतात. ड्युअल चॅनल ABS सिंगल चॅनल ABS पेक्षा अधिक सुरक्षा देते.
Bajaj Pulsar N160
ड्युअल-चॅनल ABS असलेली ही भारतातील सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे. त्याची किंमत 1.30 लाख रुपयांपासून सुरू होते. पल्सर N160 हे 164.82cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनसह येते.
Bajaj Pulsar NS160
बजाज पल्सर NS160 देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे, याला ड्युअल-चॅनल एबीएस देखील मिळतात. त्याची किंमत 1.35 लाख रुपये आहे. पल्सर NS160 160.3cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिनसह येते.
TVS Apache RTR 200 4V
ड्युअल-चॅनल ABS देणारी ही भारतातील पहिली मास-मार्केट मोटरसायकल होती. त्याची किंमत 1.40 लाख रुपये आहे. यात 197.7cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते.
Bajaj Pulsar NS200
Bajaj ने अलीकडे Pulsar NS200 अपडेट केले आहे. यात आता मानक वैशिष्ट्य म्हणून ड्युअल-चॅनल ABS मिळते. यात 199.5cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. त्याची किंमत 1.47 लाख रुपये आहे.
हेही वाचा – Electric Bike : बाईक नव्हे रॉकेटच..! टॉप स्पीड १३० किमी; फक्त १० हजारात होईल तुमची!
Yamaha FZ 25
Yamaha FZ 25 मध्ये ड्युअल-चॅनल ABS देखील देण्यात आला आहे. त्याची किंमत 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 249cc, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्ट इंजिन मिळते.