Jobs : ओपनएआय (OpenAI)ने गेल्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित चॅटबॉट चॅटजीपीटी (ChatGPT) लाँच केले आणि तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. असे म्हटले जाते की भविष्यात ते मानवाने केलेली सर्व कामे करण्यास सुरवात करेल आणि अनेक नोकऱ्या खाईल. पण तुम्हाला माहीत आहे का की OpenAI, ChatGPT तयार करणाऱ्या कंपनीने काही पदांसाठी भरती काढली आहे. कंपनी या पदांसाठी 3.7 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्याची तयारी करत आहे.
OpenAI त्यांच्या कंपनीत सामील होण्यासाठी नवीन लोकांना शोधत आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जॅन लीके यांनी उपलब्ध भूमिका आणि आवश्यक कौशल्ये यांची माहिती दिली आहे. ज्यांना कोडिंग, मशीन लर्निंग आणि इतर गोष्टींचे चांगले ज्ञान आहे, त्यांचा वार्षिक पगार 3.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
रिसर्च-ओरिएंटेड पोजिशन उपलब्ध
‘The 80,000 Hours Podcast’ च्या अलीकडील भागावरील चर्चेत, OpenAI मधील SuperAlignment चे प्रमुख, जॅन लीके यांनी खुलासा केला की सध्या अनेक रिसर्च-ओरिएंटेड पदे उपलब्ध आहेत. लीक यांनी सांगितले, की कंपनी अनेक रिसर्च इंजिनीयर्स, रिसर्च वैज्ञानिक आणि रिसर्च मॅनेजर्स नियुक्त करण्याचा विचार करीत आहे.
हेही वाचा – WI vs IND 5th T20 : शुबमन गिलचं नशीबच फुटकं, सूर्यालाही पश्चात्ताप!
रिसर्च इंजिनीयर्सना 2 ते 3.7 कोटी पगार
OpenAI च्या SuperAlignment टीमसाठी रिसर्च इंजिनीयर आवश्यक आहे. रिसर्च इंजिनीयर सेफ्टी रिसर्चसाठी जटिल प्रयोगांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असतील. या नोकरीतील वार्षिक पगार US $ 2,45,000 (सुमारे 2 कोटी) ते US $ 4,50,000 (सुमारे 3.7 कोटी) पर्यंत असेल. याशिवाय अतिरिक्त भरपाईही मिळणार आहे.
चॅट जीपीटी म्हणजे काय?
ChatGPT एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस साधन आहे. ChatGPT हा एक प्रकारचा चॅटबॉट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट करू शकता. तुम्ही ChatGPT ला कोणताही प्रश्न विचारू शकता. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!