Chandrayaan-3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ग्रीसहून थेट बंगळुरू येथील इस्रोच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या दिवशी चांद्रयान-3 चंद्रावर उतरले तो दिवस म्हणजे 23 ऑगस्ट, आता हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ (National Space Day) म्हणून साजरा केला जाईल. पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय अंतराळ दिन तिसर्या चंद्र मोहिमेच्या यशाचा उत्सव साजरा करेल.
पंतप्रधान बंगळुरू येथील इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये शास्त्रज्ञांना संबोधित करत होते. ते म्हणाले, ”मी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर असलो, तरी माझे मन फक्त भारतातच होते. कारण इस्रो चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची तयारी करत होते. चांद्रयान-3 च्या यशामागे ज्यांचा हात आहे त्यांना लवकरात लवकर भेटून सलाम करू इच्छित होतो. मी अधीर झालो होतो.”
हेही वाचा – युवराज सिंग दुसऱ्यांदा बनला ‘बाप’, सोशल मीडियावर दिली Good News!
मोदी म्हणाले की, 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या लँडिंगचा प्रत्येक सेकंद अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात आहे. हा नवा भारत आहे, जो तांत्रिकदृष्ट्या आणि नव्या पद्धतीने विचार करतो. हाच भारत आहे जो अंधाऱ्या भागातही जातो आणि प्रकाश पसरवून जगाला प्रकाशित करतो. चांद्रयान-3 च्या यशावर जगभरात भारताच्या वैज्ञानिक कामगिरीची जोरदार चर्चा होत आहे. चंद्रावरील चांद्रयान-3 च्या लँडर विक्रमच्या टचडाउन पॉइंटला ‘शिवशक्ती’ असे नाव देऊन संपूर्ण चंद्र मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांच्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!