तुझो अभिमान वाटता गो..! चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशात रत्नागिरीच्या कन्येचा वाटा

WhatsApp Group

Chandrayaan-3 Mission : इस्रोचे चांद्रयान-3 बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आणि संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या या भागापर्यंत पोहोचू शकलेला नाही. जग जे करू शकले नाही ते भारताने केले आहे. इस्रोच्या या मोहिमेत महाराष्ट्रातूनही अनेक जण सहभागी झाले होते. त्यापैकी एक म्हणजे रत्नागिरीतील अश्विनी विलास जांभळीकर.

अश्विनी विलास जांभळीकर या रत्नागिरी शहरातील फाटक प्रशाला येथील माजी विद्यार्थिनी इस्त्रोमध्ये कार्यरत आहेत. भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली. फाटक शाळेची ही विद्यार्थिनी इस्रोमध्ये काम याचा रत्नागिरीकरांना अभिमान आहे. अश्विनी मुळातच हुशार होत्या. रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलमध्ये असताना मार्च 1991 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्या बोर्डाच्या गुणवत्ता यादीत नवव्या स्थानावर होत्या.

https://twitter.com/chandrayaan_3/status/1694948081052303375

हेही वाचा – विक्रम लँडरमधून बाहेर आले प्रज्ञान रोव्हर, चंद्रावर चालू लागले! पाहा ऐतिहासिक VIDEO

चांद्रयान-3 मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल आणि अंतराळयानाच्या यशस्वी लँडिंगबद्दल संपूर्ण इस्रो टीमचे अभिनंदन. संस्थेला या प्रकरणाचा अभिमान आहे. ही कोकणी मुलगी चांद्रयान मिशन टीमचा भाग होती ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचा गौरव केला, अशी मोठी आणि अभिमानास्पद माहिती रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ बाबा परुळेकर यांनी दिली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment