Chandrayaan-3 Launch : चांद्रयान मिशन-3 द्वारे भारताने पुढचे पाऊल टाकले आहे. LVM3M4-चांद्रयान-3 आज दुपारी 2:35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले आहे. चंद्राच्या दिशेने भारताची ही तिसरी मोहीम आहे.
भारताने यापूर्वी 22 ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान-1 लाँच केले होते. मात्र, 14 नोव्हेंबर 2008 रोजी चांद्रयान-1 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या सीमेजवळ पोहोचल्यावर ते तिथेच कोसळले. यानंतर 22 जुलै 2019 रोजी दुसरा प्रयत्न करण्यात आला. परंतु 2 सप्टेंबर 2019 रोजी चांद्रयान-2 चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत चंद्राभोवती फिरत असताना विक्रम लँडरपासून वेगळे झाले. जेव्हा ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर अंतरावर होते, तेव्हा त्याचा संपर्क तुटला.
1972 नंतर कोणी चंद्रावर का गेले नाही?
21 जुलै 1969 ही तारीख जगासाठी सर्वात मोठी होती. या दिवशी पहिल्यांदाच माणसाने चंद्रावर पाय ठेवला होता. हा महान माणूस म्हणजे नील आर्मस्ट्राँग. यानंतर 1972 मध्ये यूजीन सर्नन चंद्रावर गेले. त्यानंतर आजपर्यंत एकही माणूस चंद्रावर गेला नाही. आता प्रश्न पडतो की असे का झाले? यानंतर कोणत्याही देशाने चंद्रावर मनुष्य का पाठवला नाही? या मागचे कारण काय होते?
हेही वाचा – चांद्रयान-3 ची अवकाशात ऐतिहासिक झेप🔥पाहा Video
1972 नंतर कोणत्याही व्यक्तीला चंद्रावर न पाठवण्यामागे पैसा हे सर्वात मोठे कारण आहे. बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक मायकेल रिच म्हणतात, “चंद्रावर मानवयुक्त मोहीम पाठवण्यात खूप खर्च आला होता, तर त्याचा फारसा वैज्ञानिक फायदा झाला नाही.”
2004 साली अमेरिकेने पुन्हा एकदा चंद्रावर मानवी मोहिमेची योजना आखली होती. त्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डब्ल्यू जॉर्ज बुश यांनीही प्रस्ताव मांडला होता. यासाठी US $ 104,000 मिलियन अंदाजे बजेट देखील तयार करण्यात आले होते. मात्र, प्रचंड बजेटमुळे हा प्रकल्प तिथेच बारगळला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!