Andhra Pradesh : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजयवाडाच्या बाहेरील केसरपल्ली येथील गन्नावरम विमानतळासमोरील मेधा आयटी पार्कजवळ त्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदींशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, अनुप्रिया पटेल, चिराग पासवान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही हजेरी लावली.
पवन कल्याण उपमुख्यमंत्री
पीठापुरम विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले पवन कल्याण यांना चंद्राबाबू मंत्रिमंडळाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. पवन कल्याण यांनी त्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरू केला. चिरंजीवी यांनी 2008 मध्ये प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली. तथापि, त्यांच्या भावाने प्रजा राज्यम पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पवन कल्याण यांनी 2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली.
The moment we've all been waiting for 😭
— ᴘɪꜱᴛᴀʸᶱᶸʳᴸᶱᵛᵉ (@_Ur_My_Lobee_) June 12, 2024
No pawan kalyan pass without liking this tweet 🔥❤️🔥🙏🏼
Let's show the power of Janasena ❤️🔥🔥💥#NaraChandrababuNaidu
#PawanKalyanAneNenu pic.twitter.com/J7AdOqVeLA
हेही वाचा – Ration Card धारकांसाठी महत्त्वाची बातमी! मोफत रेशनसाठी ‘हे’ काम 30 जूनपर्यंत करा, नाहीतर..
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त, टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनीही आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
रजनीकांत शपथविधीचे साक्षीदार
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते अभिनेता चिरंजीवी केसरपल्लीच्या आयटी पार्कमध्ये असलेल्या गन्नावरम मंडळात पोहोचले.
आंध्र प्रदेश विधानसभेत एकूण 175 आमदार आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 26 मंत्री असू शकतात. आंध्र प्रदेशातील एनडीएमध्ये टीडीपी, भाजप आणि जनसेना यांचा समावेश आहे. या निवडणुकीत एनडीएने 164 जागा जिंकल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा