CBSE Board Exams 2023 : सीबीएसई १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होत आहेत. देशभरातील संलग्न शाळांमध्ये इयत्ता १२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि इयत्ता १०वीच्या अंतर्गत मूल्यांकन सुरू आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरची आतुरतेने वाट पाहत असतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच मॅट्रिक बोर्ड परीक्षा रोल नंबर आणि इंटरमिजिएट बोर्ड परीक्षा रोल नंबर जारी करेल.
सीबीएसई बोर्ड परीक्षेचा रोल नंबर
बोर्डाने स्वीकारलेल्या टाइमलाइननुसार, सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२३ रोल नंबर किंवा अॅडमिट कार्ड जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्याने निवडलेल्या विषयांच्या परीक्षेच्या तारखेसह वेळापत्रक आणि परीक्षा केंद्राचा तपशील रोल नंबर किंवा प्रवेशपत्रावर आढळेल. बोर्ड लवकरच cbse.gov.in आणि parikshasangam.cbse.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करेल. शालेय प्रमुख त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियलसह ते तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
हेही वाचा – IPhone 11 फक्त १५,९९९ रुपयांत..! सोडू नका ही धमाकेदार संधी; करा ‘असा’ खरेदी!
रोल नंबर कसा मिळवायचा?
शाळांमध्ये शिकणारे नियमित विद्यार्थी, रोल नंबर जाहीर झाल्यानंतर, ते त्यांच्या संबंधित शाळांमधून गोळा करू शकतील. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनंतर शिक्षक रोल नंबर किंवा प्रवेशपत्र देईल.
खासगी विद्यार्थ्यांचा रोल नंबर
सीबीएसई अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर खासगी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचा रोल नंबर किंवा प्रवेशपत्र जारी करते. एकदा रिलीझ झाल्यानंतर, सर्व खासगी शाळेतील विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर विचारलेले आवश्यक तपशील प्रविष्ट करून त्यांचा रोल नंबर तपासण्यास आणि डाउनलोड करण्यास सक्षम असतील.