‘तेरे नाम’ गाण्यानं केला घोळ..! रेल्वे ट्रॅकवरचं शूटिंग ‘राधे भाई’ला पडलं महागात; पाहा VIDEO!

WhatsApp Group

dupilcate salman khan azam ali : लखनऊचा डुप्लिकेट सलमान खान म्हणजेच आझम अली अन्सारी याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, आझम अन्सारीनं टी-शर्टशिवाय दलीगंज रेल्वे पुलाच्या रुळावर पडून रील बनवली होती. आझमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर लखनऊ शहर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओची दखल घेतली. त्यानंतर आझम अन्सारीविरुद्ध रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेता सलमान खानच्या प्रसिद्ध चित्रपट ‘तेरे नाम’मधील ‘तेरे नाम हम किया है’ या गाण्यावर आझमनं हा रील बनवला.

यापूर्वीही गुन्हा दाखल!

पोलिसांनी सध्या आझमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी ८ मे रोजी ठाकूरगंज पोलिसांनी आझमवर शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करून त्याला अटक केली होती. त्यावेळी क्लॉक टॉवरवर जमाव जमवून आझमनं रिल केला होता. त्याच्यावर ठाकूरगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र नंतर त्याला जामीन मंजूर झाला.

हेही वाचा – २०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…

कोण आहे हा डुप्लिकेट सलमान खान?

आझम अन्सारी हा जुन्या लखनऊचा रहिवासी आहेत. सलमान खानचा चाहता असल्यानं तो त्याच्यासारखे कपडे आणि ब्रेसलेट घालतो. सलमानच्या सर्व स्टाईल तो कॉपी करतो. आणि सोशल मीडियावर सलमानच्या गाण्यांचे व्हिडिओ बनवतो. युट्यूब आणि इंस्टाग्रामवरही त्याचे खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर ८७.६ पेक्षा जास्त यूजर आझम अन्सारीला फॉलो करतात. इथं त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये त्यानं सलमानच्या गाण्यांवर डान्स केला आहे. आझमनं बनवलेला व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. लखनऊला जाऊनही अनेकजण आझमसोबत फोटो काढतात.

सलमान खानचे पुढील चित्रपट

तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीचा आगामी चित्रपट ‘गॉड फादर’चा टीझर रिलीज झाला आहे. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी त्याच्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याची फॅन फॉलोइंगही चांगली आहे. लोक त्याच्या ‘गॉड फादर’ या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये चिरंजीवीची धमाकेदार स्टाईल पाहायला मिळत आहे. या अॅक्शनपॅक टीझरची खास गोष्ट म्हणजे यात बॉलिवूड स्टार सलमान खानही दिसत आहे.

हेही वाचा – मुंबईत ना दिल्लीत, एलोन मस्कचा ‘हा’ मराठमोळा मित्र राहतो पुण्याच्या…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या सलमान खान चित्रपटाच्या शूटिंगसाठी ‘लेह लडाख’मध्ये आहे. सलमान आणि पूजा हेगडे पुढचे चार दिवस लेह-लडाखच्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करणार आहेत. यानंतर सलमान मुंबईत परत येईल आणि काही अॅक्शन सीक्वेन्स शूट करेल. त्याचबरोबर आगामी काळात सलमान ‘टायगर ३’ आणि ‘भाईजान’ व्यतिरिक्त ‘किक २’ आणि ‘नो एंट्री’मध्ये काम करताना दिसणार आहे.

Leave a comment