

Ghaziabad Car blows Students : गाझियाबादमध्ये दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भांडणाच्या वेळी एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने येते आणि दोन विद्यार्थ्यांना जोरात धडकते. गाडीच्या धडकेने विद्यार्थ्याने हवेत उडतात. तरीही इतर विद्यार्थी त्याला मारत राहतात.
ही घटना बुधवारी दुपारी गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. शहरातील एका खासगी महाविद्यालयातील बीबीए आणि बीसीएच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात रस्त्यावर झालेल्या जोरदार मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॉलेजचे विद्यार्थी एकमेकांना भिडत आणि मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
हेही वाचा – PHOTOS : वातावरण टाईट..! जान्हवी कपूरचं ‘व्हिटामिन C’ पाहिलं का?
त्यानंतर भरधाव वेगात असलेली पांढऱ्या रंगाची कार विद्यार्थ्यांच्या दिशेने येते. गाडी जवळ येत असल्याचे पाहून काही विद्यार्थी पळून जातात मात्र दोन विद्यार्थ्यांना त्याचा धडक बसते. कारची धडक इतकी वेगवान आहे की एक विद्यार्थी हवेत उडून डोक्यावर जमिनीवर पडला. कार चालक एवढ्यावरच न थांबता इतर विद्यार्थ्यांवर गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या गटातील विद्यार्थी पुन्हा जमिनीवर पडलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करू लागतात.
Peak Ghaziabad. Disturbing video.
A speeding car gate-crashes a brawl. The brawl didn't stop though. pic.twitter.com/p3qyBf0DKt
— Piyush Rai (@Benarasiyaa) September 21, 2022
कार जप्त करताना गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एकमेकांना मारहाण करणारे विद्यार्थी एकाच कॉलेजचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आहे. दोन्ही गटातील काही विद्यार्थ्यांना आम्ही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचवेळी पोलीस फरार विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले आहेत.