मोठी बातमी..! आता 13 भाषांत देता येणार ‘ही’ परीक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय!

WhatsApp Group

CAPF Constable Recruitment : सीएपीएफ कॉन्स्टेबल भरती परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. यामुळे स्थानिक तरुणांना CAPF मध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल. ASC द्वारे ही कॉन्स्टेबल (GD) परीक्षा घेतली जाते. या भरतीमध्ये देशातील लाखो उमेदवार सहभागी होतात. माहितीनुसार, हिंदी आणि इंग्रजीशिवाय ही परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

परीक्षा कधी होणार?

ही भरती परीक्षा 01 जानेवारी 2024 पासून घेतली जाईल. गृह मंत्रालयाने कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की ते CAPF मध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागास प्रोत्साहित करेल. या निर्णयाचा लाखो तरुणांना फायदा होणार आहे.

हेही वाचा – कॉम्प्युटरसारखी ताकद! 16GB RAM असलेला 5G फोन भारतात लाँच; किंमत आहे…

परीक्षा कोणत्या भाषांमध्ये होणार?

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त ज्या भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी या भाषांचा समावेश आहे. या निर्णयामुळे लाखो उमेदवारांनी त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा दिल्यास त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल, असा गृहमंत्रालयाचा विश्वास आहे. या निर्णयानंतर, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे स्थानिक तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी अपेक्षा आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment