Canara Bank : तुमचे खाते देखील कॅनरा बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कॅनरा बँकेने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या नऊ सुविधांसाठी आकारले जाणारे शुल्क बदलले आहे. मात्र, बँकेने लागू केलेले नवीन दर ३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. कॅनरा बँकेच्या ग्राहकांना आता चेक रिटर्न, ईसीएस डेबिट रिटर्न, एटीएम मनी ट्रान्झॅक्शन, फंड ट्रान्सफर, इंटरनेट-मोबाइल बँकिंग, ऑनलाइन फंड ट्रान्सफर, नाव बदलणे आणि पत्ता बदलण्यासाठी नवीन शुल्क भरावे लागेल.
नऊ सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल
कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नऊ सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे चेक बँकेने परत केला तर ग्राहकाकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. कोणत्याही बदलानंतर, १००० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या चेकसाठी २०० रुपये शुल्क भरावे लागेल. १००० ते १० लाख रुपयांच्या रकमेसाठी, हे शुल्क ३०० रुपये असेल.
हेही वाचा – बदाम खाल्ल्याने माणूस हुशार होतो का? वाचा काय खरं नी काय खोटं!
बँकेच्या बाजूने खात्यात किमान शिल्लक ठेवण्याबाबतही बदल करण्यात आले आहेत. किमान शिल्लक राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड आकारला जाईल. किमान शिल्लक मर्यादा ग्रामीण भागासाठी रु. ५०० आणि निमशहरी भागासाठी रु. १००० आहे. त्याचप्रमाणे, शहरी/मेट्रोसाठी, किमान रकमेची मर्यादा २००० रुपये आहे. ही रक्कम न ठेवल्याबद्दल बँकेने २५ रुपये ते ४५ रुपये आणि वेगवेगळ्या क्षेत्रांवर अवलंबून जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
…यासाठी जीएसटी आकारला जाणार!
बँक खात्यात एखाद्याचे नाव जोडणे किंवा हटवणे यासाठीही शुल्क भरावे लागेल. कोणतेही नाव जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी १०० रुपये आणि जीएसटी आकारला जाईल. हे शुल्क खिडकीतून अर्ज करण्यासाठीच लागू होईल. ऑनलाइन मोडमध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. संयुक्त खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचे नाव हटवण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मोबाईल नंबर, ई-मेल आणि पत्ता इत्यादी बदलण्यासाठी फी देखील भरावी लागेल. महिन्यातून चार वेळा एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही. यानंतर प्रत्येक व्यवहारावर ५ रुपयांसह जीएसटी भरावा लागेल.
या सेवांच्या शुल्कात बदल
- चेक रिटर्न
- ECS डेबिट रिटर्न
- किमान शिल्लक
- लेजर फोलिओ
- इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवा
- ऑनलाइन फंड ट्रान्स्फर
- ATM व्यवहार