

IPhone 14 Camera Problem : आयफोन १४ लॉन्च झाल्यापासून चर्चेत आहे. कधी त्याच्या डिझाईनमुळे आणि नवनव्या फिचर्समुळे, तर कधी त्यातल्या काही समस्यांमुळे त्याबद्दल सतत चर्चा होत असतात. काही दिवसांपूर्वी, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यूजर्सनी तक्रार केली होती, की पाठच्या कॅमेरामध्ये समस्या येत आहेत आणि Instagram, TikTok किंवा Snapchat सारखे थर्ट पार्टी अॅप्स वापरताना खूप आवाज येतो. कॅमेरा वापरताना त्यात वायब्रेशन आणि विचित्र आवाज येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा आवाज लेन्समधून येत असल्याचे कळतं.
असं सांगितलं जात असलं, तरी असे आवाज फक्त थर्ड-पार्टी अॅप्समधून येत आहेत आणि सध्या आयफोन कॅमेरा अॅपमध्ये अशी कोणतीही समस्या नाही. काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की iPhone 14 Pro आणि Pro Max च्या ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सिस्टम (OIS) मध्ये समस्या आहे. याचं कारण असं की नवीन फोन सेकेंड जेनरेशन सेन्सरसह येतात, जे कॅमेरा लेन्स स्थिर ठेवण्यासाठी भौतिकरित्या हलवतात. या समस्येचा परिणाम फक्त काही फोनवर होतो असं दिसतं. अॅपलनं यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर दिलेलं नाही.
So @DongleBookPro captured some real gems with the busted 14 Pro Max camera 😳 pic.twitter.com/9mgJ6ua3Un
— Luke Miani (@LukeMiani) September 18, 2022
हेही वाचा – IPhone 14 आणि त्याच्या तीन भावांची घोषणा..! तिघांची किंमत महागडीच; तरीही वाचा!
So uh, we’re having some issues with the 14 Pro Max camera pic.twitter.com/7HH1wLFjdF
— Luke Miani (@LukeMiani) September 16, 2022
नवीन iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max 128GB, 256GB, 512GB, आणि 1TB स्टोरेजसह येतात. खाली त्यांची किंमत दिली आहे.
- iPhone 14 Pro (128GB) – १,२९,९०० रुपये
- iPhone 14 Pro (256GB) – १,३९,००० रुपये
- iPhone 14 Pro (512GB) – १,५९,००० रुपये
- iPhone 14 Pro (1TB) – १,७९,००० रुपये
- iPhone 14 Pro Max (128GB) – १,३९,००० रुपये
- iPhone 14 Pro Max (256GB) – १,४९,००० रुपये
- iPhone 14 Pro Max (512GB) – १,६९,००० रुपये
- iPhone 14 Pro Max (1TB) – १,८९,००० रुपये