केंद्राकडून रब्बी पिकांची MSP जाहीर! हरभऱ्याच्या हमीभावात 210, तर मोहरीचा सर्वात जास्त 300 रुपयांनी वाढवला

WhatsApp Group

MSP For Rabi Crop : सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. सणापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने 6 रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मंजुरी दिली. यासाठी सरकार 87,657 कोटी रुपये खर्च करणार आहे. गहू, हरभरा, मसूर, मोहरी, बार्ली आणि सूर्यफूल बिया या सहा रब्बी पिकांसाठी नवीन किमान आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रीमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नवीन एमएसपी दरांमध्ये गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता नवीन दर 2,425 रुपये प्रति क्विंटल असेल. त्याचप्रमाणे मोहरीच्या एमएसपीमध्ये 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता त्याचा नवीन खरेदी दर 5,950 रुपये प्रति क्विंटल असेल.

सरकार ज्या दराने शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते त्याला किमान आधारभूत किंमत म्हणतात. बाजारात या पिकांचे दर सरकारच्या एमएसपीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकतात. एमएसपी थेट पिकांच्या सरकारी खरेदीशी संबंधित आहे. देशात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, सरकार मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन खरेदी करते आणि नंतर ते सरकारी गोदामांमध्ये साठवते.

हेही वाचा – DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट​​! महागाई भत्ता वाढला, केंद्र सरकारची घोषणा

आता नवीन एमएसपी दरांमध्ये, बार्लीच्या दरात 130 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे आणि त्याचा नवीन दर 1,980 रुपये प्रति क्विंटल असेल. त्याचप्रमाणे, हरभरा (देशी) च्या एमएसपीमध्ये 210 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे आणि त्याचा नवीन दर 5,650 रुपये प्रति क्विंटल असेल.

सरकारने मसूरच्या दरात 275 रुपयांची वाढ केली असून त्याचा नवीन एमएसपी दर 6,700 रुपये प्रति क्विंटल आहे. तर तेलबिया पीक सूर्यफूल बियाणांच्या दरात 140 रुपयांनी वाढ करण्यात आली असून नवीन दर 5,940 रुपये प्रति क्विंटल असेल.

याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (डीए आणि डीआर) 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर वाराणसीमध्ये नवीन रेल्वे-रोड पूल बांधण्याच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment