सुशांत सिंह राजपूतने चंद्रावर खरेदी केलीये जमीन! तुम्हीही करू शकता, कशी?

WhatsApp Group

चंद्रावर जीवन शक्य होईल, की नाही यावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. त्यामुळए चंद्रावर मानव कधी स्थायिक होईल, हे सांगणे सोपे नाही. मात्र, त्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. पृथ्वीवरील काही कंपन्या चंद्रावरील जमीन विकण्याचा दावा (Buying Land on Moon) कसा करतात, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक श्रीमंत लोकांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यांच्यामध्ये अनेक उद्योगपती आणि अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींचा समावेश आहेत.

चंद्रावर प्लॉट रजिस्ट्री झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. समुद्र आणि बेटांप्रमाणे अवकाश कोणत्याही देशाच्या ताब्यात येत नाही. अशा स्थितीत प्रश्न पडतो की मग चंद्रावरील जमीन कोण आणि कशी विकत आहे?

चंद्रावरील जमीन कोण विकत आहे?

Luna Society International आणि International Lunar Lands Registry या दोन्ही कंपन्या आहेत, ज्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतात. Lunarregistry.com या साईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चंद्रावरील वेगवेगळ्या भागात उपलब्ध जमिनीची किंमत वेगळी आहे. जर तुम्हाला शांततेच्या समुद्रात चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला 63.07 डॉलर प्रति एकर म्हणजेच 5261 रुपये मोजावे लागतील.

यांनी विकत घेतल्यात जमिनी

चंद्रावर जमीन खरेदीची प्रक्रिया आजपासून नाही तर काही वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. 2002 मध्ये हैदराबादचे राजीव बागरी आणि 2006 मध्ये बंगळुरूचे ललित मोहता यांनी या एजन्सींमार्फत चंद्रावर भूखंड खरेदी केला होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही चंद्रावर जमिनीचा एक छोटा तुकडा खरेदी केला होता.

हेही वाचा – जगातील सर्वात महागडी धूळ, किंमत करोडो रुपये! जाणून घ्या कारण

एका रिपोर्टनुसार, चांद्रयान-3 च्या यशानंतर जम्मू-काश्मीरचे व्यापारी रुपेश मेसन यांनीही चंद्रावर जमीन खरेदी केली. मेसन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चंद्रावरील ही मालमत्ता न्यूयॉर्कमधील ‘द लूनर रजिस्ट्री’कडून खरेदी केली होती आणि 25 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आली होती. चंद्रावर भूखंड खरेदी करणारे लोक असा विश्वास करतात, की आज नाही तर उद्या चंद्रावर जीवन निश्चितपणे स्थिर होईल.

चंद्रावरील भूखंड विकणे कायदेशीर आहे का?

Outer Space Treaty, 1967 नुसार, चंद्रावर कोणत्याही एका देशाची मक्तेदारी नाही आणि सुमारे 110 देशांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या विश्वावर संपूर्ण मानवजातीचा हक्क आहे. यासाठी कोणत्याही ग्रह किंवा उपग्रहावरील जमिनीचे मालकी हक्क कोणालाही देता येणार नाहीत. मात्र, या एजन्सी वर्षानुवर्षे चंद्रावरील जमिनी विकत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment