

Flipkart Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आजकाल एक आकर्षक सेल सुरू आहे. या विक्रीचा लाभ घेऊन तुम्ही विविध उत्पादने स्वस्तात खरेदी करू शकता. प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्ट कूलिंग डेज सेल सुरू झाला आहे. सेलमध्ये एअर कंडिशनर, कूलर आणि रेफ्रिजरेटर्सवर आकर्षक सवलत उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट सेल ६ मार्चपासून सुरू झाला आहे आणि 9 मार्चपर्यंत चालेल. यामध्ये एअर कंडिशनरवर ५० % सूट देण्यात आली आहे. त्याच वेळी, तुम्ही कूलर आणि रेफ्रिजरेटर ५० % पर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता.
अर्ध्या किमतीत एअर कंडिशनर
तुम्ही Lloyd चा ०.८ टन ३ स्टार स्प्लिट एसी रु.२६४९० मध्ये खरेदी करू शकता. जर तुम्हाला विंडो एसी हवा असेल तर तुम्ही Blue Star चा १ टन क्षमतेचा ३ स्टार एसी रु. २६९०० मध्ये खरेदी करू शकता. दुसरीकडे, तुम्ही Voltas चा १.५ टन क्षमतेचा ३ स्टार विंडो एसी फ्लिपकार्ट वरून २९९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
हेही वाचा – Maharashtra 7/12 Utara Online : सातबारा उतारा ऑनलाइन कसा काढायचा? जाणून घ्या सोपी प्रोसेस!
सेलची मायक्रो साइट फ्लिपकार्टवर देखील लाइव्ह झाली आहे. यावर तुम्हाला ब्रँड्सनुसार एअर कंडिशनरचा पर्यायही मिळेल. तुम्हाला स्वस्त पर्याय हवा असल्यास, तुम्ही MarQ चा ०.८ टन क्षमतेचा स्प्लिट एसी रु.२१४९० मध्ये खरेदी करू शकता. यावर १७ % सूट मिळणार आहे.
५० % सवलतीबद्दल बोलायचे झाल्यास, Voltas १.५ टन स्प्लिट इन्व्हर्टर एसी वर ५४ टक्के सूट आहे. डिस्काउंटनंतर हा एसी ३६३९० रुपयांना उपलब्ध आहे. Whirlpool चा १.५ टन स्प्लिट एसी फ्लिपकार्ट सेलमध्ये ५१% च्या सूटसह ३६२०० रुपयांना उपलब्ध आहे.
रेफ्रिजरेटरवरही ऑफर
तुम्हाला Samsung चा २५३ लिटर क्षमतेचा इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर २५०९० रुपयांना मिळेल. तर १८४ लिटर सिंगल डोअर Whirlpool रेफ्रिजरेटर १२८९० रुपयांना उपलब्ध आहे. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. Samsung चा १८९ लिटरचा ५-स्टार रेफ्रिजरेटर १७९९० रुपयांना उपलब्ध आहे.
यावर १२००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. दुसरीकडे, गोदरेजचा २ स्टार डबल डोअर रेफ्रिजरेटर १९९९० रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहक सवलतीत पंखे आणि कुलर देखील खरेदी करू शकतात. यावरही ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!