नदीत पडला बुलडोझर..! पुल पाडायला गेला आणि झाला भयानक अपघात; VIDEO व्हायरल!

WhatsApp Group

Bulldozer Crashes Into River : आपल्या फोनवर नेहमी व्हायरल व्हिडिओ लक्ष वेधून घेत असतात. असे व्हिडिओ पाहून सर्वजण थक्क होतात. असाच एक व्हिडिओ उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे. एका नदीत चक्क बुलडोझर पडला आहे. गंगा कालव्यावरील १०० वर्ष जुना पूल पाडण्याच्या प्रयत्नात बुलडोझरच नदीच्या पाण्यात पडतो. बुलडोझरचा चालक थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला.

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पानिपत-खतिमा महामार्गावर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सिखरा येथील गंगा कालव्यावर १०० वर्षांहून अधिक जुना पूल आहे. जीर्ण पुलामुळे २०२१ मध्येच नवीन पूल बांधण्यात आला. तेव्हापासून हा पूल वाहतुकीसाठी जवळपास बंदच होता. परंतु, महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने या पुलाचे बांधकामही लवकरच प्रस्तावित असून, त्यादृष्टीने रविवारी गंगानगरवरील जुना व जीर्ण पूल पाडण्यात येत होता.

हेही वाचा – १ ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम..! तुमच्या खिशावर होणार परिणाम; वाचा सविस्तर

यादरम्यान बुलडोझर (जेसीबी) चालक राकेश यादव हा पूल पाडत होता. पुलाचा काही भाग बुलडोझरने तोडण्यात येत होता. पुलाचा काही भाग कोसळताच उरलेला पूल खाली पडू लागला. त्यामुळे जेसीबी मशीनही पाण्यात बुडण्यास सुरुवात झाली. यादरम्यान जेसीबी मशिन चालकाने कशीतरी सुरक्षित ठिकाणी उडी मारली. माहिती मिळताच पोलीस व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. पूल पाडल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. पोलीस ठाणे शिखेडा यांनी घटनास्थळी पोहोचून यंत्रणेची दखल घेतली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment