Rakshabandhan 2023 : तेलंगणातील पेड्डापल्ली येथे रक्षाबंधनाच्या सणाचे रूपांतर शोकात झाले. येथे सणाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर बहिणीने शेवटची राखी बांधून रडत रडत भावाला निरोप दिला. हे पाहून सर्वांचे डोळे पाणावले.
रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना पेड्डापल्ली येथे घेडली. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली आणि ती पाहून सर्वजण रडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – ‘त्या’ प्रसिद्ध शिक्षकाला 7,000 विद्यार्थिनींनी बांधली राखी! पाहा VIDEO
पेड्डापल्ली गावात राहणाऱ्या चौधरी कनकय्या नावाच्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे कनकय्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घरात एकच गोंधळ उडाला. रडत रडत बहिणीचीही अवस्था वाईट झाली आहे. संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.
चौधरी कनकैय्या यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. चौधरी कनकैयाची धाकटी बहीण आपल्या भावाच्या मृतदेहाजवळ पोहोचली आणि त्याच्या मनगटावर राखी बांधली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौधरी यांची बहीण गौरम्मा पुत्तेडू आणि नातेवाईकही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. यावेळी चौधरी कनकैय्या यांना निरोप देणाऱ्या सर्वांचे डोळे पाणावले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!