Video : मोठी बातमी..! गुजरातमध्ये केबल ब्रिज कोसळला; ४०० जण पाण्यात!

WhatsApp Group

Bridge Collapsed In Gujarat : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीत केबल पूल तुटल्याची बातमी आहे. पूल तुटला त्यावेळी जवळपास ४०० लोक पुलावर होते असे सांगण्यात आले आहे. तो तुटताच लोक नदीत पडले. या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनीही या घटनेबाबत अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्यात आली आहे. आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – IND Vs SA : सोपा कॅच सोडला, तोही विराट कोहलीने..! विश्वास नसेल तर पाहा Video

मोरबीतील हा पूल नुकताच पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात आला हे लक्षात घेण्यासारखे आहे. मात्र, दुरुस्ती करूनही याठिकाणी जमलेल्या गर्दीच्या वजनामुळे पूल कोसळला. काही लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री ब्रजेश मेरजा म्हणाले की, प्रशासन संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा पूल कोसळला तेव्हा त्यांनी महिला आणि लहान मुलेही त्याच्या केबलला लटकताना पाहिली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment