Pakistan : पाकिस्तानच्या कराची शहरातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. गर्लफ्रेंडच्या बर्गरचा एक बाइट घेतल्यामुळे बॉयफ्रेंडने आपल्या मित्राची हत्या केली आहे. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा तपास अहवाल आता पोलिसांनी सादर केला आहे. (Boyfriend Kills Friend For Taking Bite Of His Girlfriend’s Burger)
पोलिसांच्या चौकशीत ही घटना कराचीतील डिफेन्स फेज 5 भागात घडल्याचे उघड झाले. रिपोर्टनुसार, अली किरियो असे पीडित तरुणाने त्याचा मित्र डॅनियलच्या गर्लफ्रेंडचा बर्गर खाल्ला, त्यामुळे रागाच्या भरात डॅनियलने त्याची हत्या केली. पीडित अली हा सत्र न्यायाधीशाचा मुलगा आहे, तर डॅनियल एका पोलीस अधिकाऱ्याचा (एसएसपी) मुलगा आहे. घटनेच्या दिवशी डॅनियलने त्याची गर्लफ्रेंड शाझिया हिला आपल्या घरी मेजवानीसाठी बोलावले होते. अली किरियो आणि त्याचा भाऊही त्या मेजवानीला उपस्थित होते.
हेही वाचा – बापरे…! झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्याने वाचवले प्राण
रायफळने गोळीबार
पोलिसांनी सांगितले की, डॅनियलने त्याची गर्लफ्रेंड शाझिया आणि स्वतःसाठी दोन बर्गर ऑर्डर केले होते. अली किरिओने शाझियाच्या बर्गरचा बाइट घेतल्याने वाद सुरू झाला. यावर डॅनियल इतका संतापला की त्याने गार्डची रायफल हिसकावून घेतली आणि अलीवर गोळीबार केला आणि त्याला बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान अलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा तपास केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस एसएसपी यांचा मुलगा डॅनियल याला घटनेसाठी जबाबदार धरून प्रकरण बंद केले आणि अहवाल सादर केला. डॅनियल अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा